
सात नियम पाळा आणि कोणत्याही परीक्षा उत्तीर्ण व्हा ..धानय्या कौटगीमठ

कराड : सातारा जिल्ह्यातील कराड येथील रयत शिक्षण संस्था चे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज मध्ये सेट नेट परीक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात आला. 411 विद्यार्थी सहभागी होते.अक्कलकोट चे शिक्षक श्री धानय्या कौटगीमठ प्रमुख पाहुणे म्हणून येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 41 विद्यार्थी सेट पास झाले होते त्यांचे यावेळी कौटगी मठ हस्ते सत्कार करण्यात आला. कॉलेज चे प्राचार्य डॉ मोहन राजमाने उपस्थित होते आणि कार्यशाळा ची समन्वय का म्हणून डॉ रामचंद्र व्हनबटे सर यांनी काम पाहिले सुत्र संचलन डॉ कोमल कुंदप यांनी केले.

पुढे कौटगीमठ म्हणाले की विद्यार्थी सेट नेट परीक्षा उत्तीर्ण व्हायचे असेल तर सात नियम पालन करणे बंधनकारक आहे.
पाहिलं ध्येय निश्चित करा, दुसरा परीक्षा ची स्वरूप समजावून घ्या, तिसरं अभ्यासक्रम लिहा आणि समजून घ्या , चौथ् पाठीमागील प्रश्न पत्रिका सोडवा व विश्लेषण करा , पाचवं कमीतकमी पुस्तक वाचन करा , सहावा स्वतःची नोट्स काढा आणि शेवटी सातवा नियम , वेळेची नियोजन .

या सात नियम काटेकोरपणे पालन केले तर यश मिळतोच . धानय्य सरानी स्वतःची कथा सांगून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास दिलेत. देशातील 77 वेळा सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम नोंदविला. स्वतःचे अभ्यास बद्दल अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.आणि त्यांचं यु ट्यूब वरील मोफत मार्गदर्शन घेतलेल्या कराड चे व 41 जण विद्यार्थी उत्तीर्ण झाले . धानय्य सरांची मार्गदर्शन घेऊन आता पर्यंत 805 विद्यार्थी सेट परीक्षाझाले . व्यवस्थित रित्या आणि परीक्षा भिमूक अभ्यास केला तर यश मिळतोच अशी खात्री धानय्य सरानी सांगितले. धानय्या सरानी सह कुटूंब या कार्यक्रमात सहभागी झाले .पत्नी संगीता , मुलगा समर्थ , मुलगी शांत लक्षमी आणि वडील गुरूलिंगय्या हेही उपस्थित होते आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा दिलेत. ही मोफत कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी श्री नंदाजी कदम ,मुख्याध्यापक मंगरुळे प्रशाला यांनी ही आधार दिलेत.
