अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पुणे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन!
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पुणे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन!

दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ८”९८व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पुणे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन हस्ते उद्घाटन पार पडले. पुण्यातील टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये हे संपर्क कार्यालय असणार आहे. यावेळी साहित्य संमेलनासाठी आपल्या लेखणीतून योगदान देणाऱ्या पत्रकार बांधव आणि भगिनींचा सत्कारही माझ्या हस्ते करण्यात आला.

आपलं पुणे शहर राज्याची सांस्कृतिक राजधानी असून साहित्याची भूमी आहे. याच पुण्याचं प्रतिनिधित्व करताना, मोठी परंपरा लाभलेल्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभल्याचे समाधान निश्चितच मोठे आहे.

या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह श्री. सुनिताराजे पवार, सरहद पुणेचे अध्यक्ष श्री. संजय नहार यांच्यासह डॉ. सतिश देसाई, श्री. शैलेश पगारिया आदी मान्यवर उपस्थित होते.
