*पांचाळ सोनार राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा व वधुवर पालक परिचय मेळावा संपन्न*…….

सोलापूर –येथील पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना व पांचाळ सोनार समाज संथा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 डिसेंबर रोजी , विजापूर रोड वरील निर्मिती लॉन्स येथे राज्यस्तरीय सामाजिक बांधिलकी प्रदान सोहळा व वधुवर पालक परिचय मेळावा मोठया दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. महेशभैय्या धाराशिवकर जिल्हा अध्यक्ष सुवर्णकार संघटना व शहर प्रमुख शिवसेना उबाठा, विशेष अतिथी मा. श्री दीपकजी कलढोणे सर, गायक, संगीतकार, लेखक आणि संत साहित्याचे अभ्यासक, प्रमुख अतिथी सर्वश्री गिरीश पंडित सहा. आयुक्त सोलापूर महापालिका, उद्योजक भारत कारीकर सोलापूर – कोल्हापूर, अजित पोतदार -वशीकर मिरज, महाराष्ट्र शासन जल संपदा विभाग कोल्हापूर चे उप अभियंता मा. श्री. उदय माणकापुरे साहेब, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आदरणीय वसंतराव बळीराम पोतदार आलूरकर यांच्या उपस्थित अतिशय नयनरम्य सोहळा संपन्न झाला.

प्रारंभी दीप प्रज्वलन करून श्री संत नरहरी महाराज प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्ताविक अध्यक्ष श्री वसंत पोतदार यांनी केले. आयुष्याचा उपयोग समाजासाठी करत संस्कारक्षम कार्य करणाऱ्या लोकांना समाजा पुढे आणण्याचे काम पांचाळ सोनार समाज गौरव समिती करीत आहे. आयुष्यात समाजसेवा व देश सेवा करणं अत्यंत महत्वाचे आहे. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सन्मान पत्र, आकर्षक सन्मान चिन्ह, तसेच सोनार समाजाची कुलदेवी श्री कालिका देवी महात्म्य हा ग्रंथ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये समाज भूषण पुरस्कार सर्वश्री गिरीश पंडित लातूर, जगन्नाथ धर्माधिकारी मसूर, प्रमोद वेदपाठक माढा, सुभाष वेदपाठक मोडनिंब, सुरेश महामुनी, मोहन वेदपाठक,, प्रकाश पोतदार, श्रीमती शशिकला वेदपाठक सर्व सोलापूर, चंद्रकांतदादा वेदपाठक अकलकोट, श्री सुभाष घोडके व सुभाष दीक्षित दोघेही रा. पुणे हे अनुक्रमे अपरिहार्य व प्रकृती अ स्वास्थ्यमुळे उपस्थित राहू न शकल्याने त्यांचे पुरस्कार त्यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्द केले. आदर्श पतसंस्था पुरस्कार श्री विश्वकर्मा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था जत जिल्हा सांगली या संस्थेचे चेअरमन श्री देवेंद्र पोतदार यांना देण्यात आले. कृतज्ञता पुरस्कार श्री दीपक कलढोणे सर व श्री सतीश जेऊरकर सर यांना प्रदान केले. आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्रा.डॉ.नंदकुमार धर्माधिकारी, व सौं. प्रियांका धर्माधिकारी दोघेही पुणे, श्री आण्णा दीक्षित, रविकांत पोतदार सोलापूर, संतोष पोतदार माळशिरस. सुवर्ण युवा रत्न -श्री सारंग महामुनी पंढरपूर, उद्योग रत्न – सर्वश्री रत्नकुमार म्हेत्रे अहिल्यानगर, प्रितीश वेदपाठक सोलापूर, आदित्य आष्टीकर आष्टी मोहोळ. विज्ञान रत्न – इंजिनियर सर्वश्री जितेंद्र दीक्षित, अथर्व दीक्षित, अथर्व महामुनी,, विनायक पंडित, कुमारी दीपाली दोडमनी सर्व सोलापूर. विशेष सत्कार प्रा. अमर दीक्षित सर यांना पी. एच. डी. पदवी मिळाल्याबद्दल, आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल श्री रोहित तपासे, एम. पी. एस सी. मार्फत डॉ मनोज वेदपाठक यांची डॉ व्ही. एम. मेडिकल कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून तर त्यांचे लहान बंधू श्री सौरभ वेदपाठक यांची महाराष्ट्र शासन गृह विभागात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.पुरस्कार प्रदान सोहळा संपल्यानंतर लागलीच वधू वर मेळावा सुरु करण्यात आला. या मेळाव्यात साधारणपणे चारसे च्या पुढे वधू वरांनी आपले नांव नोंदणी केली. वरांच्या मानाने मुलींची संख्या कमी असल्याचे दिसून आले.याबाबत समितीचे अग्रणी प्रवर्तक श्री संतोषशेठ कळमणकर म्हणाले कीं, वधू वर पालक परिचय मेळावा ही काळाची गरज आहे. समाजाच्या हिताच्या दृष्टीने मुला मुलींचे विवाह जुळावे, पालकांचा वेळ व पैसा वाचावा असे भावनिक आवाहन करून समाज एकोप्याने राहावा म्हणून लाखो रुपये खर्चून दोन दोन महिने राबून आम्ही मोफत मेळावा घेतो पण मुली व्यासपीठावर येऊन आपला परिचय देत नाहीत. यापुढे मेळावा घ्यावा कीं नको याबद्दल गांभीर्याने विचार करावा लागेल अशी खंत व्यक्त केली. तसेच नोकरदार, व्यावसायिक याच बरोबर सुवर्ण कारागीर मुलांनाही मुली द्या. सुवर्ण करागिरी ही श्रेष्ठ असून समाजाचा खरा चेहरा कारागीरच टिकवू शकतो. असे मत व्यक्त केले. अध्यक्ष वसंत पोतदार यांनी आपल्या प्रस्ताविकेत काळ बदलतो आहे यातून सोनार समाज बाजूला कसा असेल. सुवर्ण करागिरी बरोबरच आधुनिक तंत्रज्ञान, उच्च शिक्षण, संशोधन, उद्योग या क्षेत्राची कस सोनार बांधवानी घेतली आहे. त्या बरोबरच विवाहासाठी अनुरूप वधू वर यांची निवड एक काळजीचा विषय बनत चालला आहे. लग्न हा दोन जीवांचा आयुष्याचा प्रवास असतो या प्रवासात आपला जोडीदार योग्य हवा. वाढत्या फसवणूकीच्या घटना घडत आहेत हे रोखण्यासाठी पारखून निवडा. सोशल मीडिया मुळे दूरचे लोक जवळ आले, फेसबुक, व्हाट्सअप तपासून जोडीदाराची अधिक माहिती सहज मिळावीता येते. पालकांना विश्वासात घेऊन जोडीदाराची योग्य माहिती मिळवूनच लग्नाचा निर्णय घ्या असे मत व्यक्त करून सर्व वधू वरांना त्यांच्या मनातील स्वप्नांना साजेसा आयुष्याचा साथीदार शोधण्यांच्या त्यांच्या प्रयत्नांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.विशेष अतिथी गायक, संगीतकार, लेखक, कवी आणि संत साहित्यिक श्री दीपक कलढोणे सर यांनी संत नरहरी महाराज यांच्या जीवन कार्यावर दैनिक संचार या वृत्तपत्रात लेखमालिका प्रसिद्ध केल्याबद्दल सोनार समाजाच्या वतीने त्यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांनी ही योग्य वयात लग्नाचा विचार करणेबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महेशभैय्या धाराशिवकर यांनी आपले विचार मांडून नियोजनाचे भरभरून कौतुक केले. पूर्ण शक्तिनीशी समितीच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहण्याचे त्यांनी अभिवचन दिले. मेळाव्यासाठी उपस्थित सर्व वधू वर सुचकांचे श्री निलेश धाराशिवकर यांनी सत्कार केले.कार्यक्रमासाठी सांगली येथील उद्योजक श्री प्रकाश पोतदार, इस्लामपूर चे हिरोहोंडा एजेन्सी चे मालक श्री वशीकर, श्री संत नरहरी समाधी मंदिर समिती पंढरपूचे जेष्ठ विश्वस्त श्री संजय आष्टीकर अकलकोट जेऊर येथील से. नि. प्राचार्य श्री राज सोनार सर, सोनार समाजाचे नेते श्री राजेश पंडित रेणापूरकर अंबाजोगाई, पनवेलचे श्री बाळकृष्ण पोतदार, मुबंई येथील भाभा सेंटरचे श्री पंडित साहेब, बार्शीचे श्री प्रकाश महामुनी साहेब, सांगली अरगचे श्री उद्धवराव पोतदार, आकाशवाणीचे वृत्त निवेदक श्री महेश अनाळकर इंजि. दीपक पोतदार , हरिओम ज्वेलर्स चे दीपक कुरुलकर, श्यामदादा पोतदार, बाळकृष्ण अंजनगावकर , श्री सुनील पंडित, श्रीनाथ पोतदार, सौं मनीषा पोतदार वशीकर मिरज, आय सी डी सी चे सौं गायत्री ( संगीता ) वेदपाठक, इंजि. सौं किरण जमखंडीकर, श्राविका प्रशालेच्या श्रीमती राजश्री पोतदार यांची लक्षवेधी उपस्थिती होती. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी समितीचे अग्रणी प्रवर्तक सर्वश्री मोहन मंद्रूपकर, संजय मैदर्गीकर, संतोष कळमणकर, अध्यक्ष वसंत पोतदार उपाध्यक्ष विजयकुमार पोतदार, सचिव दत्तगुरु वेदपाठक, सहसचिव गिरीश जमखंडीकर खजिनदार गजानन सोनार,इंजि. विजयकुमार पोतदार, इंजि. रुद्रप्पा दोडमनी प्रा. डॉ. अमर दीक्षित महिला प्रतिनिधी सौं. मृणालिनी मैदर्गीकर, सौं संध्या कळमणकर, सौं पल्लवी महामुनी, पांचाळ सोनार संस्थेचे अध्यक्ष निलेश धाराशिवकर, उपाध्यक्ष अमोल महामुनी, सचिव सतीश पोतदार, अविनाश पंडित, श्री कालिका पतसंस्थेचे चेअरमन अमोल दीक्षित, ऑडिटर प्रकाश कांबळे, अनील टंकसाली, प्रकाश तपासे, मॅनेजर लक्ष्मीकांत जिंदम, महिला कर्मचारी सौं अनिता सारंगमठ, श्रीमती राजश्री टाक,श्री विनायक स्वामी आदिनी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन श्री प्रवीण देशमुख सर यांनी केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!