*राष्ट्रीय लिंगायत संघ,भारत प्रदेशाध्यक्ष पदी राजशेखर कापसे*
लायन्स क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजशेखर कापसे यांची राष्ट्रीय लिंगायत संघ,भारत या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून सन्माननिय निवड करण्यात आली. राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रदीप बापू वाले यांनी ही निवड बसव कल्याण येथे जाहीर केली. पूज्य श्री जगद्गुरु डॉ चन्नबसवानंद स्वामीजी, चन्नबसवेश्वरा ज्ञानपीठ, बेंगळुरू यांनी कापसे यांचा सन्मान केला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
राजशेखर कापसे हे लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक सेवेमध्ये अग्रेसर आहेत.कापसे यांनी सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती या जिल्ह्याचे प्रमुख पद डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्याबद्दल त्यांना लायन्स आंतरराष्ट्रीय अध्यक्षांनी सन्मानित केले आहे. त्याच बरोबर कापसे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय(मुंबई वगळून) लायन्स संघटनेच्या व्हॉईस चेअरमन म्हणून कार्य केले आहे. या सर्व वरील कार्याची दखल घेऊन त्यांची लिंगायत प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
लिंगायत समाज्याच्या उन्नती साठी अनेक सामाजिक उपक्रम घेऊन काम करण्याचे अभिवचन त्यांनी दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महेश हिंडोळे, राजशेखर हिप्परगी, मल्लिनाथ साखरे,डॉ प्रदीप घिवारे,डॉ विवेक करपे, सूर्यकांत कडबगांवकर, गौरीशंकर चनशेट्टी, शिवशरण खूबा, सूर्यकांत अल्लोळी सर, श्रीकांत झिपरे, विजय कुलकर्णी, अशोक भांजे आदींनी कापसे यांचे अभिनंदन केले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!