साहित्य विषयक

महाराष्ट्र साहित्य परिषदेतील नूतनीकरण केलेल्या माधवराव पटवर्धन सभागृहाचे उद्घाटन २१फेब्रुवारीला

२१ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि के. के. बिर्ला फौंडेशनचे संचालक सरस्वती सन्मान समितीचे प्रमुख डॉ. सुरेश ऋतुपर्ण यांच्या शुभहस्ते होणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतील नूतनीकरण केलेल्या माधवराव पटवर्धन सभागृहाचे उद्घाटन २१फेब्रुवारीला…पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतील नूतनीकरण झालेल्या ऐतिहासिक माधवराव पटवर्धन सभागृहाचे आणि कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार, २१ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि के. के. बिर्ला फौंडेशनचे संचालक सरस्वती सन्मान समितीचे प्रमुख डॉ. सुरेश ऋतुपर्ण यांच्या शुभहस्ते होणार आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमाला माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या नूतनीकरण प्रकल्पासाठी भरघोस अर्थसाहाय्य करणारे परिषदेच्या विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्‍वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्‍वस्त यशवंतराव गडाख, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्‍वजीत कदम उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम २१ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनच्या सभागृहात होणार आहे.

, ‘परिषदेच्या अंतर्गत नूतनीकरणाचे कित्येक दशकांचे लेखकांचे आणि साहित्य रसिकांचे स्वप्न साकार होत आहे, याचा कार्यकारी मंडळाला आनंद आणि समाधान आहे. हे अंतर्गत नूतनीकरण केवळ दहा महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे. नूतनीकरण झालेले माधवराव पटवर्धन सभागृह वातानुकूलित आणि ध्वनिप्रतिबंधित करण्यात आले असून सभागृहात नाट्यगृहासारखी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. उत्कृष्ट ध्वनिव्यवस्थेसह सर्व सुविधा रसिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या सर्व सारस्वतांची छायाचित्रे एका आकारात देखण्या रुपात लावण्यात आली आहेत. माधवराव पटवर्धन सभागृहात ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरलेले मराठी साहित्यिक वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांच्या छात्राचित्रांचे स्वतंत्र दालन करण्यात आले आहे. वास्तुविशारद माधव हुंडेकर तसेच ध्वनी आणि प्रकाश योजनेबाबत मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ विजय पुरंदरे यांनी परिषदेला विनामूल्य मार्गदर्शन केले.

दुबईस्थित प्रसिध्द उद्योगपती विनोद जाधव यांच्या देणगीतून नूतनीकरण झालेल्या परिषदेच्या वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाचे, अभ्यासिकेचे आणि कल्याणराव जाधव सभागृहाचे तसेच कृष्णकुमार गोयल यांच्या देणगीतून तयार झालेल्या पहिल्या मजल्यावरील बैठककक्षाचे काम पूर्ण झाले असून त्याचेही स्वतंत्र कार्यक्रमात लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी लिफ्टच्या कामासाठी देणगी दिली आहे. ते काम लवकरच सुरु होणार आहे. राजीव बर्वे यांनी दिलेल्या देणगीतून द. के. बर्वे व्यासपीठ परिषदेत साकारणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button