धानय्या कौटगीमठ यांच्या मोफत यु ट्यूब मार्गदर्शन खाली कर्नाटक के सेट परीक्षेत १५४ विद्यार्थी उत्तीर्ण!!
कर्नाटक राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच केरळ ,तामिळनाडू ,गुजरात तसेच महाराष्ट्र मध्ये राहणारी विद्यार्थी के सेट परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले.

धानय्या कौटगीमठ यांच्या मोफत यु ट्यूब मार्गदर्शन खाली कर्नाटक के सेट परीक्षेत १५४ विद्यार्थी उत्तीर्ण!!

अक्कलकोट: येथील के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक धानय्या कौटगीमठ यांच्या मोफत यु ट्यूब मार्गदर्शन खाली के सेट परीक्षेत १५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले .
विद्यापीठ अनुदान आयोग ,नई दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक परीक्षा प्राधिकरण यांनी २४ नोव्हेंबर२०२४ रोजी कर्नाटक सहाय्यक प्राध्यापक परीक्षा ( के सेट ) घेतले होते त्यांची निकाल ४ जानेवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत १५४ विद्यार्थी धानय्या सरांच्या मार्गदर्शन घेऊन उत्तीर्ण झाले

कर्नाटक राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच केरळ ,तामिळनाडू ,गुजरात तसेच महाराष्ट्र मध्ये राहणारी विद्यार्थी के सेट परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले.

धारवाढ चे अंध विद्यार्थीनी वसंता एच , बागल कोट चे रिक्षा चालक मंजुनाथ , जम्मू काश्मीर मध्ये इंडियन आर्मी मध्ये सेवा करणाऱ्या सैनिकाची पत्नी श्वेता ,गोल्ड मेदलिस्ट हासन ची वेदावती , सिद्धगंगा मठात सेवा करणारा गरीब विद्यार्थी विश्वनाथ असे अनेक गरजू , महिला ,दिव्यांग विद्यार्थी घवघवीत यश मिळविले आहेत.
धानय्य सरानी देशातील विविध राज्यातील ७७ वेळा सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम करून ,स्वतःला मिळालेल्या ज्ञान , कौशल ,अनुभव इतर विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने यु ट्यूब मार्फत मोफत मार्गदर्शन दर रोज एक तास देत आहेत. नेट आणि सेट परीक्षा पेपर क्रमांक एक मध्ये असणारी घटक अध्यापन कौशल , संशोधन अभियोग्यता , संवाद कौशल्य , उतार आकलन , माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण , उच्च शिक्षण प्राणांली आणि। इंग्रजी साहित्य , तसेच इतर विषयावर मोफत मार्गदर्शन करीत असल्याचे समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. आता पर्यंत ९५८ विद्यार्थी सेट नेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

धानय्य सरांना या सेवेत त्यांच पत्नी संगीता, मुलगी शांत लक्ष्मी आणि मुलगा समर्थ तसेच वडील गुरुलिंगय्या यांनी खंबीरपणे साथ देत आहेत
