
भोजराज बनसोडे सावित्री फातिमा गुणगौरव पुरस्काराने सन्मानीत.
——-

हंजगी,

अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील वाल्मिकी बालक प्राथमिक आश्रम शाळेतील वस्तीगृह मदतनीस भोजराज रामचंद्र बनसोडे यांना शिक्षक भारती संघटना सोलापूर शाखेच्या वतीने सोलापूर येथे प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाचा सावित्री फातिमा गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी अध्यक्ष म्हणून राज्याध्यक्ष अशोक बेलसरे उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रणितीताई शिंदे,सुजितकुमार काटमोरे,सुभाष मोरे,विजयकुमार गुंड,
रामनयन दुबे,सातलिंग शटगार,रुपालीताई कुरुमकर,भैरवनाथ कानडे,दादासाहेब लाड,नवनाथ गेंड,सुरेश कणमुसे आदी मान्यवर उपस्थित होते.गेल्या 24 वर्षे आश्रम शाळेत वस्तीगृह मदतनीस म्हणून अतिशय प्रामाणिक सेवा बजावणारे भोजराज बनसोडे यांची शिक्षक भारती संघटनेनी दखल घेत यंदाच्या सावित्री फातिमा गुणगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.विशेष करून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यामध्ये आणि वस्तीगृहात मदतनीस पदाला विशेष महत्त्व आहे. वस्तीगृहात अतिशय काळजीवाहू पद म्हणून या पदाकडे पाहिले जाते.या पदाच्या कर्तव्याची जाणीव ठेवून गेल्या अनेक वर्षापासून भोजराज बनसोडे हे वस्तीगृह मदतनीस म्हणून जोख कामगिरी बजावताना दिसतात.याचीच दखल घेत शिक्षक भारती संघटनेनी मदतनीस भोजराज बनसोडे यांना यंदाचा मानाचा फातिमा गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी जिवाजीराव शिक्षण परिवारातील मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ

अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील प्राथमिक आश्रम शाळेतील वस्तीगृह मदतनीस भोजराज बनसोडे दाम्पत्यांचा प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्री फातिमा गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करताना.
