अक्कलकोट येथील श्री.एजाज मुतवल्ली यांच्या “दिशा एम्पायर” या वास्तूला वाणिज्य बिल्डिंग श्रेणी मध्ये प्रथम पारितोषिक….
आऊटस्टँडिंग काँक्रीट स्ट्रक्चर अवॉर्ड्स 2024-25 चे वितरण सोहळा संपन्न

अक्कलकोट येथील श्री.एजाज मुतवल्ली यांच्या
“दिशा एम्पायर” या वास्तूला वाणिज्य बिल्डिंग श्रेणी मध्ये प्रथम पारितोषिक….
आऊटस्टँडिंग काँक्रीट स्ट्रक्चर अवॉर्ड्स 2024-25 चे वितरण सोहळा संपन्न….


अक्कलकोट –असोसिएशन कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आऊटस्टँडिंग काँक्रीट स्ट्रक्चर अवॉर्ड्स 2024-25 चे वितरण हॉटेल बालाजी सरोवर करण्यात आले. यांचं कार्यक्रमात अक्कलकोट येथील एजाज न. मुतवल्ली यांच्या
“दिशा एम्पायर” या वास्तूला वाणिज्य बिल्डिंग श्रेणी मध्ये प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे फंक्शनल हेड -इंजि जयशंकर कन्टीकारा, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त इंजिनीयर संदीप कारंजे, शहर अभियंता इंजिनिअर सारिखा अकुलवार व झोनल हेड टेक्निकल इंजि अरविंद महाजन उपस्थित होते.
या पुरस्कारासाठी सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यातून विविध चार श्रेणी मधून इमारतींच्या निवडी करण्यात आल्या होत्या पुरस्काराकरिता सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण तब्बल 86 इमारतींची पाहणी करण्यात आली. पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून डॉ. शशिकांत हलकुडे, स्ट्रक्चरल कन्सल्टंट इंजि जगदीश दिड्डी, इंजि शितलराज सिंदखेडे, इंजि प्रशांत मोरे, इंजि मनोहर लोमटे, आर्किटेक्ट चंदुलाल अंबाल व इंजि राजीव दिपाली यांनी काम पाहिले. पर्यावरण पूरक बांधकाम, कमी कार्बन उत्सर्जन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, रूफ टॉप सोलर, बांधकामाच्या उत्कृष्ट पद्धती,काँक्रीट चा दर्जा, ग्रीन बिल्डिंग फीचर्स या निकषावरती पुरस्कारांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमास सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून आलेल्या बांधकाम क्षेत्रातील सुमारे 700 अभियंते आर्किटेक्ट यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला
याप्रसंगी 10 जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये अक्कलकोट येथील एजाज न. मुतवल्ली यांच्या “दिशा एम्पायर” या वास्तूला पब्लिक बिल्डिंग श्रेणी मधे प्रथम पारितोषिक देण्यात आले. या वास्तूचे आर्किटेक्ट म्हणून प्रशांत सिंगी, स्ट्रक्चरल डिजायनार अनिल गांधी, पुणे. तर साईट इंजिनियर अशोक येणगुरे यांनी काम पहिले.
अक्कलकोट साठी अभिमानास्पद बाब असून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
