गावगाथा

मंगळवेढा आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे उद्घाटन.

इंधन बचतीसाठी उपक्रम

मंगळवेढा आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे उद्घाटन.

इंधन बचतीचे महत्व व त्यासंबंधी व्यापक जन-जागृती करण्यासाठी चालुवर्षी दि.१६ जानेवारी २०२५ ते दि.१५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत इंधन बचत मासिक कार्यक्रम सन २०२५ आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. सर्व इंधन वापर कर्त्यांमध्ये पेट्रोलिअम उत्पादनासंबंधी व्यापक जनजागृती करणे, इंधनावरील अनावश्यक खर्च टाळणे, परदेशी चलनाचा विनियोग कमी करणे व वातावरणाचे संरक्षण करणे हे इंधन बचत कार्यक्रम साजरा करण्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. सदरचा इंधन बचत मासिक कार्यक्रम सन २०२५ राबविण्याकरिता दि.१६ जानेवारी २०२५ रोजी मंगळवेढा आगारात सदर मोहिमेचे उद्घाटन मा. श्री अमोल गोंजारी विभाग नियंत्रक राज्य परिवहन सोलापूर विभाग यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आगार व्यवस्थापक श्री.संजय भोसले हे उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमास विभागीय अभियंता तुषार चौधरी, भांडारपाल ज्योती बंडगर हे देखील उपस्थित होते. यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री विठ्ठल भोसले यांनी इंधन बचत अभियान कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर विभाग नियंत्रक श्री गोंजारी साहेबांनी आगारातील चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांना इंधन बचतीच्या अनुषंगाने मौलिक मार्गदर्शन केले. चालक, वाहक तसेच यांत्रिक कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाज करित असताना इंधन बचतीसाठी प्रयत्न करुन इंधनाची बचत करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच सध्या चालू असलेल्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता मोहीमेच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना सुरक्षितपणे वाहने चालवावीत असे मार्गदर्शन केले. तसेच चालकांनी व्यसनापासून दूर राहून आपले कर्तव्य पार पाडावे अशा सूचना केल्या. तसेच उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता मिळविण्याकरता उत्पन्नात वाढ करून सर्व चालक वाहकांनी प्रयत्न करावेत अशा सूचना केल्या. तसेच आगाराच्या खर्चात काटकसर करुन आगार नफ्यात आणण्याकरिता सामुहिक योगदान देण्यात यावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रमामध्ये केपीटीएल वाढीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून केपीटीएल मध्ये वाढ करावी असे आवाहन केले. सदर कार्यक्रमास सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्री शरद वाघमारे, वाहतूक निरीक्षक श्री योगेश गवळी, आगार लेखाकार श्री योगेश कांबळे तसेच चालक, वाहक,यांत्रिक तसेच प्रशासकिय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button