अस्मिता संचालित रामगोपाल केडिया प्राथमिक विद्यालयचा महिला गौरव दिन
येथे थेंबा थेंबातून कर्तव्याचा सागर व्हावा विश्व कल्याणासाठी महिला शक्तीचा जागर व्हावा.

अस्मिता संचालित रामगोपाल केडिया प्राथमिक विद्यालयचा महिला गौरव दिन

येथे थेंबा थेंबातून कर्तव्याचा सागर व्हावा
विश्व कल्याणासाठी महिला शक्तीचा जागर व्हावा.

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस तसेच १२ जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस यांचे औचित्य साधून अस्मिता संचालित रामगोपाल केडिया प्राथमिक विद्यालयामध्ये महिला गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी इयत्ता पहिली ते चौथीचे सर्व पालक, विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वाती वाघ, बागेश्री देशपांडे, राजश्री लाखन, विष्णू वझे तसेच संस्थेचे अध्यक्ष शेखर पालखी उपस्थित होते याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक व पालकांनी सावित्रीबाई फुले व जिजाऊ यांच्यावर आधारित वीर गीते ओव्या साहसनृत्य सादर केली. सावित्रीबाई फुले यांचा वसा आणि वारसा चालवणाऱ्या माजी विद्यार्थिनी व पालक यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शाळेची माजी विद्यार्थिनी श्रद्धा शिवराम केळजी प्रोफेसर ठाकूर कॉलेज आर्किटेक्चर विभाग डिसेंबर २०२५ मध्ये श्रद्धाला यूनिवर्सिटी ऑफ कोलंबियामध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून बोलविण्यात आले आहे.तसेच तन्वी धुरी अभिनेत्री हिचा आगामी चित्रपट वेल डन आई येत आहे.यावेळी अनेजबकर्तबगार महिला व पालक यांचा सत्कार करण्यात आला.
