गावगाथा

क्रीडा क्षेत्रामुळे आरोग्य, शिस्त आणि संघभावनेचा विकास – महेश इंगळे

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे वार्षिक क्रीडा दिनाचे बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी महेश इंगळे यांनी व्यक्त केले मनोगत

क्रीडा क्षेत्रामुळे आरोग्य, शिस्त आणि संघभावनेचा विकास – महेश इंगळे

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे वार्षिक क्रीडा दिनाचे बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी महेश इंगळे यांनी व्यक्त केले मनोगत

तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे चेअरमन महेश इंगळे यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती.

(अक्कलकोट, दि. १९/०१/२०२५) –
मैदानी खेळांमुळे आपल्या शरीराचा बौद्धिक व शारीरिक दृष्टीने सर्वांगीण विकास होतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच विविध खेळांमध्ये ही सहभाग नोंदविल्यास विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्य निदर्शनास येते आणि शारीरिक आणि बौद्धिक विकासही होतो म्हणून क्रीडा क्षेत्रामुळे आरोग्य, शिस्त आणि संघभावनेचा विकास कसा होत असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व काही कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे चेअरमन महेश इंगळे
यांनी व्यक्त केले नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनच्या वार्षिक क्रीडा दिनाचे बक्षीस वितरण समारंभ तंत्रनिकेतनचे व श्री वटवृक्ष महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी महेश इंगळे बोलत होते. कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात हा सोहळा संपन्न झाला. महाविद्यालयाच्या आवारात
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, कॅरम आणि बॅडमिंटन (मुलांसाठी) तसेच क्रिकेट, कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ, थ्रोबॉल आणि डॉजबॉल (मुलींसाठी) अशा खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. प्रारंभी
बक्षीस वितरण कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष महेश इंगळे यांचे स्वागत प्राचार्य एन.बी. जेऊरे सर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. या वेळी उपप्राचार्य व्ही.डी.पवार, शैक्षणिक समन्वयक श्री.ए.ए.भावठणकर आणि सर्व विभाग प्रमुख एम.बी.माने, डी.ए.जनगोंडा, व्ही.एस.खिलारी उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धांमध्ये मॅकेनिकल विभाग क्रिकेट मधील विजेते कर्णधार तौफिक मुल्ला, उपविजेते सिव्हिल विभाग कर्णधार प्रितम विटकर, व्हॉलीबॉल विजेते कॉम्प्युटर विभाग कर्णधार सादिक ढाले, उपविजेते सिव्हिल विभाग कर्णधार सिद्धांत शिंपाळे,
कबड्डी विजेते मेकॅनिकल विभाग कर्णधार बामलिंग बमगोंडा, उपविजेते इलेक्ट्रॉनिक्स विभाग कर्णधार नागणसुरे, कॅरम विजेते मुले सागर जामदार, उपविजेते अथर्वे सिध्दे,
कॅरम विजेत्या मुली, विजेती पूर्णिमा आंदेवाडी, उपविजेती कोमल घोडके,
बॅडमिंटन विजेते मुले विजेता महीफूज पठाण, उपविजेता समर्थ आगटखेडे,
बॅडमिंटन विजेते मुली विजेती अल्तमश बागवान, उपविजेती मोरे समृद्धी, बुद्धिबळ विजेते मुली विजेती पूर्वी मसूती, उपविजेती भारती चव्हाण या सर्व विजेत्या उपविजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सोहळ्यात बक्षीस वितरण करून महेश इंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.बी.जेऊरे यांच्या मार्गदर्शनाखाली
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्रीडा विभागाचे सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. यामध्ये विलास चौगुले, प्रशांत देसाई, राघवेंद्र सावकार, गणेश सुतार, सागर लोणारी, काशिनाथ घुरघुरे, अल्तमश जहागीरदार, अमृता ममनाबाद, मेघा बिडवे, लक्ष्मी निंबाळ, उमेश सोनवणे, अरुण शिंदे, श्याम कदम, सोमनाथ तुकमळी, बंटी नारायणकर, प्रदीप मगदूम, मल्लिनाथ गवंडी, संजय तळवार, विपुल कडगावकर, सचिन पाटील आणि सर्व विभागातील विद्यार्थ्यांचे विशेष योगदान होते.
मागील तीन दिवसांत झालेल्या विविध खेळांच्या अंतिम फेऱ्यांमध्ये विजयी ठरलेल्या संघांना आणि खेळाडूंना ट्रॉफी, पदके आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्तम क्रीडा विभागाला विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक काशिनाथ घुरघुरे यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडासंस्कृती व एकोप्याची भावना वृद्धिंगत करण्याच्या संकल्पाने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button