स्वामींच्या दर्शनाने कार्यचालनेस नेहमीच प्रेरणा मिळत आहे – पुरुषोत्तम बरडे
पुरुषोत्तम बरडे यांचा सत्कार करताना महेश इंगळे व इतर दिसत आहेत.

स्वामींच्या दर्शनाने कार्यचालनेस नेहमीच प्रेरणा मिळत आहे – पुरुषोत्तम बरडे

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.२०/०१/२०२५)
श्री स्वामी समर्थांचे आपण निस्सिम भक्त असून त्यांच्या दर्शनाने आपणांस राजकीय व सामाजिक कार्य करण्यास नेहमीच प्रेरणा मिळत आहे असे मनोगत शिवसेनेचे मा. जिल्हाप्रमुख तथा शिवसेना सोलापूर जिल्हा लोकसभा संपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच स्वामींच्या दर्शनाकरिता येथे आले असता बोलत होते. या प्रसंगी वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी त्यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद देवून यथोचित सत्कार केला. पुढे बोलताना बरडे यांनी स्वामींचे दर्शन आपल्या प्रमाणे इतर भाविकांनाही समाधान देवून जात असल्याने व मंदिर समितीच्या वतीने भाविकांकरिता उपलब्ध करून दिलेल्या सोई सुविधांबद्दल महेश इंगळे यांनी स्वतः पुढाकाराने उभे राहून जेष्ठ, दिव्यांग व वयोवृद्ध स्वामी भक्तांना व्हीलचेअरच्या माध्यमातून, स्वतंत्र दर्शन माध्यमातून स्वामींचे दर्शन घडवून देत असल्याचे चित्र पाहून माझ्या मनाला अत्यंत समाधान लाभले आहे. श्री.वटवृक्ष मंदिरातील दर्शन व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली मंदिर समितीचे
हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे, त्यामुळे
येथे येणारे भाविक स्वामींचे दर्शन घेवून आनंदाने माघारी परतत असल्याचे प्रतिपादनही पुरुषोत्तम बरडे यांनी केले.
या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, विपुल जाधव, इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – पुरुषोत्तम बरडे यांचा सत्कार करताना महेश इंगळे व इतर दिसत आहेत.
