
*इंटरमिडीएट ड्रॉईंग परीक्षेत चपळगाव प्रशालेचे घवघवीत यश!*

चपळगाव,
महाराष्ट्र राज्य कला संचनालयकडून सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय इंटरमीडिइट परीक्षेत
ग्रामीण विद्या विकास विद्यालय येथील 32 विध्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी कु. प्रज्ञा दौ. गोविंदे हिने “A” श्रेणीने उत्तीर्ण झाली व 19 विध्यार्थी “B” श्रेणीने तसेच 12 विध्यार्थी “C” श्रेणीने उत्तीर्ण झाले.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक गुरुजनांचे संस्था अध्यक्ष मा. रविकांत पाटील साहेब, सचिव प्रभाकर हंजगे सर, कार्याध्यक्ष पंडित पाटील व सर्व संस्था सन्मानीय संचालक गण आणि प्राचार्य माने सर, पर्यवेक्षक बानेगाव,
CEO नीलकंठ पाटील सर यांनी अभिनंदन केले.
सर्वप्रथम राज्य शाळा कृती समितीकडून जिल्हा स्तरीय “कृतीशील शिक्षक” पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. कलशेट्टी सरांचे प्रशालेकडून सत्कार करण्यात आले. तद्दनंतर इंटरमिडीएट परीक्षेत बहुसंख्य विध्यार्थी उत्तीर्ण झाल्याबद्दल कला शिक्षक श्री.वन्यालोलू सरांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी उत्तीर्ण विध्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करून कौतुक करण्यात आले.
यावेळी जेष्ठ शिक्षक कदम सर, उटगे सर,कलशेट्टी सर,विजापूरे सर,श्रीमती उडचाण मॅडम व नारायणकर सर उपस्थित होते.
सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना कलाशिक्षक वन्यालोलू सर, म्हमाणे सर, दुलंगे सर, M S पाटील सर व बुरकुले सर यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सर्व गुरुजन वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आणि विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
