गावगाथा

गणेश हिरवे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार

पुरस्कार सन्मान

गणेश हिरवे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार

पूनम पाटगावे
जोगेश्वरी वार्ताहर

जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार आणि समुपदेशक गणेश हिरवे यांना नुकताच गोरेगाव येथील नंदादीप शाळेच्या ऑडिटोरियम मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा निवृत्त वरिष्ठ पोलिस महानिरीक्षक मोहन राठोड, आमदार बाळा नर, कामगार नेते अभिजित राणे, ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुंभेजकर, कॉमेडी किंग एहसान कुरेशी, पुरस्कार समिती अध्यक्ष ऍड.जगदीश जायले, काँग्रेस नेते क्लाइव्ह डायस, समाजसेवक ईश्वर रणशूर कार्यक्रमाचे आयोजक सुनील कुमरे आदी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले.हिरवे यांचे सामाजिक काम दैदिप्यमान आणि जबरदस्त असून वर्षाचे बाराही महिने ते समाजकार्यात झोकून देऊन कार्यरत असतात.नागरी समस्या सोडविण्यासाठी कायमच पुढाकार घेत असतात.विविध संस्थांनी आतापर्यंत त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राष्ट्र व राज्यस्तरीय असे एकूण १३१ पुरस्कार मिळालेले आहेत. करोना काळात देखील हिरवे यांनी अग्रेसर राहून काम केलं होत. करोना काळात केलेल्या कामाची दखल घेत त्यांना ७७ करोना वॉरियर्स सन्मानपत्र मिळालेली असून जोगेश्वरीचे स्थानिक विद्यमान खासदार आणि माजी राज्यमंत्री व आमदार रवींद्र वायकर यांनी देखील त्यांना जोगेश्वरी भूषण सेवापूर्ती पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे.हिरवे यांचा अभिमान असल्याचे अनेक मान्यवरांनी वारंवार आपल्या भाषणातून सांगितले असून महाराष्ट्र गौरव हा राज्यातील सर्वात मोठा पुरस्कार मिळाल्याने हिरवे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.महाराष्ट्रातील निवडक १६ मान्यवरांना त्यांच्या कामाची दखल घेत पुरस्कार दिल्याचे नवक्षितिज ट्रस्ट चे अध्यक्ष सुनील कुमरे आणि सचिव धर्मराज तोकला यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button