गावगाथा

कै. कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निक कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. विजयकुमार द पवार यांना जिल्हास्तरीय अभियांत्रिकी कॉलेज कृतीशील प्राध्यापक पुरस्कार.

पुरस्कार सन्मान

कै. कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निक कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. विजयकुमार द पवार यांना जिल्हास्तरीय अभियांत्रिकी कॉलेज कृतीशील प्राध्यापक पुरस्कार.
———————————————
पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत सर यांच्या संकल्पनेतून साकारलेला यंदाचा मानाचा जिल्हास्तरीय कृतीशील पुरस्कार श्री वटवृक्ष स्वामी महराज देवस्थानचे, कै. कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निक कॉलेज अक्कलकोटचे उपप्राचार्य व संगणक विभागाचे विभाग प्रमुख प्रा. श्री विजयकुमार द पवार यांना जिल्हास्तरीय अभियांत्रिकी कॉलेज कृतीशील प्राध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.काल शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट, सोलापूर येथे पार पडलेल्या “कृतीशील पुरस्कार सोहळा” दरम्यान महाराष्ट्र राज्य कृती समिती चे संस्थापक व माजी शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत सर यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रा श्री. विजयकुमार द पवार यांना गौरवण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. नागनाथ जेऊरे यांनी या सोहळ्याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व संगणक अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्राध्यापक श्री विजयकुमार पवार यांना जिल्हास्तरीय अभियांत्रिकी कॉलेज कृतीशील प्राध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल माजी शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत सर, समितीचे जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ वांगीकर व समन्वयक श्री. परमेश्वर होसूरे यांचे आभार मानले.
या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष व मार्गदर्शक मा.श्री महेशजी इंगळे, संस्थेचे संचालक आदरणीय श्री. आत्माराम घाटगे सर, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख श्री. मल्लू माने, सिविल विभागाचे प्रमुख श्री. धीरज जनगोंडा, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख श्री. वैजनाथ खिलारी, शैक्षणिक समन्वयक श्री. अमोल भावठाणकर व समस्त शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button