गावगाथाठळक बातम्या

Pune crime: केअरटेकरनेच केला मनोरुग्ण महिलेवर अत्याचार ; पुण्यात खळबळ

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे (प्रतिनिधी): राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होताना दिसत नाही आहे. रोज नवनवीन घटना घडत आहेत. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सुश्रुषेसाठी ठेवलेल्या कामगाराने मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी कामगाराला अटक केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

याबाबत पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी ३४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

पोलिसांच्या माहितीनुसार, ३८ वर्षीय पीडित महिला मनोरुग्ण आहे. आरोपीला केअरटेकर म्हणून ठेवले होते. त्याने मनोरुग्ण महिलेला धमकावून त्याने तिच्यावर अत्याचार केला. ३ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान त्याने महिलेला धमकावून वेळोवेळी अत्याचार केला. महिला मनोरुग्ण असल्याने सुरुवातीला तिने घटनेची माहिती दिली नाही. अखेर तिने याबाबतची तक्रार दिली. नंतर आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगावकर, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता देवकाते यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम अधिक तपास करत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button