गावगाथाठळक बातम्या

Akkalkot rural: गळोरगी येथील आरोग्य शिबिरात २१२ जणांची आरोग्य तपासणी

 

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (प्रतिनिधी): अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथे श्री रेवणसिध्देश्वर यात्रा महोत्सव निमित्त श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच, गळोरगी ग्रामस्थ आणि श्री स्वामी समर्थ मल्टीस्पेशालिटी हॅास्पिटल अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरात २१२ जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning    

या शिबिरात लहान मुला – मुलींची, महीलांची व पुरुषांची तपासणी करण्यात आली. शिबिरात प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब, थायरॅाईड ,हिमोग्लोबिन तपासणी आणि हाडांची तपासणी करण्यात आली. तसेच लहान मुलांमुलींचे सर्दी, खोकला व तापाची तपासणी करुन मोफत औषधे देण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning    

उपचारानंतर गरजुंना सर्व मोफत औषध पुरवठा गळोरगीचे सुपुत्र श्री संतोष बिराजदार यांच्या ए बी फॅार्मास्युटीकल्स पुणे मार्फत व हॅास्पिटलच्या वतीने करण्यात आला. प्रारंभी ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराज फोटो पुजन वे शरणय्या स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले तर आरोग्य शिबिराचे उदघाटन माजी सोसायटी चेअरमन श्री भिमाशंकर आजुरे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व उपस्थित मान्यवर, वैद्यकीय अधिकारी व हॅास्पिटल स्टाफ यांचे स्वागत युवा मंच संस्थापक अध्यक्ष श्री सिध्देश्वर बिराजदार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील सुरेश मैंदर्गी यांनी केले. तर आभार माजी सरपंच वहीदपाशा शेख यांनी मानले.

HTML img Tag Simply Easy Learning    

या वेळी ग्रामपंचायत सदस्य मल्लिनाथ बडदाळे, माजी तंटामुक्त अध्यक्ष  गुरुशांत अंदोडगी, शिवानंद बिराजदार ,  खाजाभाई नदाफ,  राजशेखर पाटील ,  संतोष जमादार , माजी सरपंच मच्छिंद्र बनसोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य खंडु हरवाळकर व गळोरगी ग्रामस्थ उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

आरोग्य शिबिर यशस्वी पणे पार पाडण्यासाठी श्री स्वामी समर्थ मल्टीस्पेशालिटी हॅास्पिटल अक्कलकोटचे डॅा योगेश वेळापुरकर( एम डी मेडीसीन) , डॅा आशुतोष जाधव( ॲार्थो सर्जन) , डॅा शितल सावळे ( स्त्री रोग तज्ञ) , डॅा रोहीत कुंभार ( बी ए एम एस) , जनसंपर्क अधिकारी श्रीशैल पावले व हॅास्पिटल स्टाफ व कर्मचारी, महेश बिराजदार, हणमंत पाटील , चंद्रकांत निरोणे,  मल्लिनाथ बिराजदार,  संतोष अंदोडगी, शशिकांत सुतार,  सिध्दाराम जकापुरे,  सिध्दाराम पाटील,  नागेश संगापुरे,  लक्ष्मण झग्गे,  सिध्दाराम बिराजदार,  काशिनाथ हरवाळकर,  विवेकानंद गौडगाव (करजगी) , कैलास आळगी,  सिध्दाराम बगले, शिवराज हिळ्ळी ,कु निलकंठ अंदोडगी व गळोरगी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button