गावगाथा

अक्कलकोट येथे संत शिरोमणी सेना महाराजांची ६५६ वी पुण्यतिथी उत्साहात

अभिषेक, भजन, रक्तदान शिबिर व गुलालाचा कार्यक्रम; नाभिक समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

अक्कलकोट येथे संत शिरोमणी सेना महाराजांची ६५६ वी पुण्यतिथी उत्साहात

अभिषेक, भजन, रक्तदान शिबिर व गुलालाचा कार्यक्रम; नाभिक समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री संत सेना महाराज नाभिक समाज बहुउद्देशीय संस्था, अक्कलकोट शहर व तालुका यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराजांची ६५६ वी पुण्यतिथी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात अभिषेक, मूर्ती स्थापना, भजन, भव्य रक्तदान शिबिर तसेच गुलालाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नाभिक समाज बांधव, भगिनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता अक्कलकोट शहराध्यक्ष श्री. लक्ष्मण विभुते यांच्या अर्धांगिनी सौ. अहिल्याताई विभुते यांच्या हस्ते श्री संत सेना महाराजांच्या मूर्तीला विधिवत अभिषेक करण्यात आला. सायंकाळी ५ वाजता गोरज मुहूर्तावर समाजातील नवदांपत्य श्री. राहुल भाले व श्री. समर्थ विभुते यांच्या हस्ते श्री संत सेना महाराजांची स्थापना करण्यात आली. रात्री अक्कलकोट भजनी मंडळाच्या वतीने भक्तिमय भजनाचा कार्यक्रम पार पडला.

HTML img Tag Simply Easy Learning    

दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांच्या शुभहस्ते भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यकारी विश्वस्त श्री. अमोलराजे जन्मेजयराजे भोसले साहेब व उपाध्यक्ष श्री. अभय खोबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी गुलालाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अक्कलकोट नगरीचे माजी उपनगराध्यक्ष श्री. यशवंत तात्या धोंगडे, उपनगराध्यक्ष श्री. ऋतुराज (बंटी) राठोड, श्री स्वामी समर्थ मंदिराचे चेअरमन श्री. महेश इंगळे यांचे चिरंजीव श्री. प्रथमेश इंगळे, आरोग्य सभापती श्री. अविनाश मडीखंबे, श्री. नागराज कुंभार, श्री. नन्नू कोरबू, श्री. इरफान कोरबू, नगरसेवक श्री. देविदास कवटगी, श्री. योगेश पवार, श्री. आबा सोमोशी, उद्योगपती श्री. कंटुअण्णा हिंडोळे, समर्थ नगर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. प्रदीप पाटील, श्री. रमेश सोडगी, श्री. रमेश पुजारी, श्री. सचिन नंदीकोले, लिंगायत न्हावी समाजाचे अध्यक्ष श्री. मारुती भाले आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचा नाभिक समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. संत सेना महाराजांच्या विचारांचे स्मरण करून समाजातील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव अधिक दृढ करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे चेअरमन श्री. सुदर्शन विभुते, शहराध्यक्ष श्री. लक्ष्मण विभुते, उपाध्यक्ष श्री. राजेश कोरे, प्रवीण राऊत, प्रभाकर सुरवसे, महेश घाटे, मार्गदर्शक पंच श्री. पद्माकर डिगे, श्रीकांत विभुते, सोमनाथ सुरवसे, भागवत विभुते, राजेंद्र सुरवसे, अमोल सुरवसे, तेजस विभुते, तालुकाध्यक्ष श्री. शिवशरण सुरवसे, प्रतीक विभुते, युवक तालुकाध्यक्ष श्रीशैल सुरवसे, बाळासाहेब कोरे, महिला तालुकाध्यक्षा सौ. अनुराधाताई सुरवसे, युवती अध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई काळे यांच्यासह प्रभाकर सुरवसे, सुमित डिग्गे, मोहन विभुते, सचिन विभुते, सचिन सुरवसे, अमर सुरवसे, शुभम विभुते, सोनल सुरवसे, अनिल कोरे, सुनील कोरे, महेश सुरवसे, संदीप राऊत, संस्थापक अध्यक्ष श्री. नरसिंग क्षीरसागर, अनिल सुरवसे, प्रभाकर कोरे, तुळशीराम कोरे, पुंडलिक कोरे, चिदानंद सुरवसे, धोंडीबा घायाळ, राहुल घायाळ, आप्पा ढंगे, खंडू ढगे, सिद्धाराम भाकरे, सचिन भाकरे, अजय सुरवसे, गजानन काळे, विजयानंद काळे यांच्यासह बहुसंख्य नाभिक समाज बांधव व भगिनींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुभाष सुरवसे सर यांनी केले, तर तालुकाध्यक्ष श्री. शिवशरण सुरवसे यांनी आभार मानले. भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि समाजातील एकोप्याचा संदेश देत श्री संत सेना महाराजांची ६५६ वी पुण्यतिथी उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button