Akkalkot: कृतिशील शिक्षक पुरस्कार प्रित्यर्थ, शिक्षक सुधीर सुतार यांचा महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मान

अक्कलकोट (प्रतिनिधी): सोलापूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक प्रशालेचे शिक्षक सुधीर सुतार यांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीकडून जिल्हास्तरीय कृतिशील शिक्षक २०२५ चे कृतीशील शिक्षक पुरस्कार लाभल्या प्रित्यर्थ श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात चेअरमन महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सुधीर सुतार सर यांचा यथोचित सन्मान केला.

याप्रसंगी बोलताना समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीकडून राज्यातील शिक्षकांचा कृतीशील शिक्षक म्हणून पुरस्कार देण्याची परंपरा सुरु झाल्यापासून शिक्षकांच्या जीवनाचे गौरव होत आहे. अशा पुरस्कारांच्या माध्यमातून अन्य शिक्षकांनाही प्रेरणा मिळत राहील असे प्रकारचे मनोगत व्यक्त करून सुधीर सुतार यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, जिल्हा परिषद शिक्षक व्यंकट धरमसाले, विश्वनाथ करकी सर, सोमनाथ सुतार, संजय आडवीतोटे, श्रीशैल गवंडी, महेश काटकर, विपुल जाधव, स्वामीनाथ मुमूडले इत्यादी उपस्थित होते.
