गावगाथा

अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाराज प्रवेश द्वार या स्वागत कमानीचे भूमीपूजन माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते संपन्न 

उद्याटंन समारंभ

अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाराज प्रवेश द्वार या स्वागत कमानीचे भूमीपूजन माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते संपन्न 

अक्कलकोट : (प्रतिनिधी)*
*येथील नामवंत राजे फत्तेसिंह चौक नवरात्र महोत्सव तरुण मंडळाचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व आधारस्तंभ अमोलराजे जन्मेजयराजे भोसले, महेश कल्याणराव तथा बाळासाहेब इंगळे यांच्या नेतृत्वाने कार्यरत असून, मंडळाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राजे फत्तेसिंह चौकात अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाराज प्रवेश द्वार या स्वागत कमानीचे भूमीपूजन माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.*

राजे फत्तेसिंह चौक नवरात्र महोत्सव तरुण मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत तथा पिट्टू सोनटक्के व मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांची राजे फत्तेसिंह चौकात अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाराज प्रवेश द्वार या स्वागत कमान असावी या करिता अक्कलकोट नगरपरिषदकडे रितसर मागणी केल्या प्रमाणे त्यास नगरपरिषदेच्या मंजुरीने सदरची कमान उभी करण्यात येत आहे. याचे भूमीपूजन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संपन्न झाले.

दरम्यान स्वागत कमानीचे भूमिपूजन सोहळा सोमकांत कुलकर्णी यांच्या विधिवत पूजनाने संपन्न झाला.

या कार्यक्रमास जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी, माजी नगरसेविका सोनाली विक्रम शिंदे, बाबासाहेब निंबाळकर, सोपानराव गोंडाळ, सुभाष गडसिंग, सुधाकर गोंडाळ, अमर शिंदे, अॅड. विजय हार्डीकर, अॅड. अश्विन बाग, स्वप्नील शहा, अभिनंदन गांधी, प्रशांत कडबगावकर, बाळा शिंदे, वासू कडबगावकर, मनोज निकम, रोहित खोबरे, मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत तथा पिट्टू सोनटक्के, लाला राठोड, बाळासाहेब देसाई-कुलकर्णी, लखन झंपले, संतोष भोसले, शिवराज स्वामी, रोहन शिर्के, पिट्टू साठे, सनी सोनटक्के, शिवा मंगरुळे, कल्याण देशमुख, रोहित निंबाळकर, मुन्ना फडतरे, संजय गोंडाळ, नरसिंग क्षीरसागर, सुमित घाडगे, विनय भोसले, गणेश ग्राम, अप्पा गवळी, निखील पाटील, गोटू माने, श्रीशैल कुंभार, रवी कदम, सौरभ शहा, मैनू कोरबू, अश्पाक काझी, दादा गंगणे, रणजीत गोंडाळ, मोहनराव साळुंके, टिल्लू गंगणे, अक्षय कळसे, प्रसन्ना तथा छोटू हत्ते, रामू पाटील, दादा सावंत, गजानन काटकर यांच्या सह नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य, शहरातील विविध भागातील नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button