गावगाथा

*सिईओ कुलदिप जंगम यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत ध्वजारोहण ..!*

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन विशेष 2025

*सिईओ कुलदिप जंगम यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत ध्वजारोहण ..!*

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर – भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कुलदीप जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करणेत आले.
या कार्यक्रमासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाच्या स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, सिईओ यांच्या सुविद्य पत्नी जंगम , तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, माध्यमिक चे शिक्षणाधिकारी सचिन जगताप, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग चे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी , बांधकाम १ चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, उप अभियंता सुनील कटकधोंड, लेखाधिकारी श्रीकांत मिरगाळे, प्रभारी समाज कल्याण अधिकारी सचिन कावळे प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सिईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करणेत आले. हरीभाई देवकरण प्रशालेचा विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत झालेनंतर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी स्पर्श निर्मूलन अभियान व कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ सर्वांना दिली. या प्रसंगी सिईओ कुलदीप जंगम व विद्यार्थ्यांच्या हस्ते हवेत तिरंगा रंगातील फुगे सोडलेत आले.
त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर भारतीय संविधान उद्देश्यीके च्या स्तंभास सिईओ कुलदिप जंगम यांनी अभिवादन केले. मुख्यालयातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सिईओ जंगम यांनी अभिवादन केले. डाएट अंतर्गत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सिईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह न प्रशस्ती पत्रक वितरीत करणेत आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp Group