गावगाथाठळक बातम्या

Pune police: पुणे पोलिस ‘ॲक्शन मोड’वर ; रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करा – आयुक्त अमितेश कुमार

पुणे (प्रतिनिधी): शहरातील कोणत्याही भागात अतिक्रमण होत असेल, तर त्याठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक करा, असे स्पष्ट निर्देश पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस दलासह महापालिकेला दिले आहेत.

पोलीस आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधताना निर्देश दिले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हवेली मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोली परिसरातील वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने समस्या आणि उपाय योजना याबाबत संयुक्तिकरित्या पाहणी केली. यावेळी पुणे महापालिका, पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी, महावितरण, आरटीओ यांचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी वाघोली परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित विभागांना पूर्तता करून घेण्याबाबत सूचना यावेळी दिल्या.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘अतिक्रमण विषयात, आज आम्ही स्वतः १ ते २ किलोमिटर चाललो मात्र या संपूर्ण १५ किलोमीटर भागात पोलिस अधिकारी, महापालिका, पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी यांना सगळ्यांना विनंती आहे की वाघोलीला ‘सर्जिकल स्ट्राईक’ची गरज आहे, हे प्रेमाने चालणार नाही. रातोरात ज्यांनी अतिक्रमण केलं आहे, त्यांच्या आस्थापना आजच्या आज बंद करा’.

“त्यांना स्वतः ते काढायला सांगा. कारण त्यांना माहिती आहे की, त्यांनी काय अतिक्रमण केलं आहे. त्यांच्याकडं असलेले परवाने सुद्धा महापालिकेने रद्द करावे. खराडी रस्त्यावर आज मी पाहिलं की रस्त्यावर लोखंड पडलेलं आहे, रस्त्यावर फर्निचर पडलं आहे. तसंच एका दारूच्या दुकानाबाहेर अंडाभुर्जीची गाडी आहे, हे सगळे रस्ते दुरुस्त करा. १० जानेवारीची वाट न बघता, या अतिक्रमणांवर सर्जिकल स्ट्राईक करून हे तोडा, असे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button