गावगाथाठळक बातम्या

Pune police: आता गुन्हेगारांचं काही खरं नाही ; पोलिस आयुक्तांनी घेतला हा मोठा निर्णय

पुणे (प्रतिनिधी): पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. त्यामुळं शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वाढती गुन्हेगारी पाहता पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे पोलिसांकडून ‘बीट मार्शल’ ही संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. अशातच आता ‘कॉप 24’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम पुणे पोलिसांनी सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत 726 पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून, सध्या या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जात आहे. लवकरच त्यांच्या सेवेची सुरुवात होईल, ज्यामुळे पुणेकरांना 24 तास गस्त घालणाऱ्या पोलिसांची मदत मिळणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘कॉप 24’ उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, 726 पोलिस कर्मचारी केवळ गस्त घालण्याचे काम करतील, आणि ते गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली कार्य करतील.

HTML img Tag Simply Easy Learning    

अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कॉप 24’ अंतर्गत पोलिस कर्मचारी स्थानिक पोलिस ठाण्याच्या दैनंदिन कामांपासून मुक्त असतील, आणि त्यांना फक्त गस्त घालण्याचं कार्य दिलं जाईल. यामुळे पुणे शहरातील पोलिसांची कार्यक्षमता वाढेल, आणि पुणेकरांना एक सुरक्षित शहर मिळेल. ‘कॉप 24’ उपक्रमामुळे पुणे शहरात पोलिसांचा अहोरात्र पहारा मिळेल, तसेच गुन्हेगारीवर चाप बसविण्यात मदत होईल. पुणेकरांना भविष्यात आणखी सुरक्षित वाटेल, अशी अपेक्षा असल्याची भावना अमितेशकुमार यांनी यावेळी व्यक्त केली. 

HTML img Tag Simply Easy Learning    

 

रस्त्यावरील गुन्हेगारी कमी करणे, एखादा गुन्हा घडल्यानंतर तत्काळ मदत करणे आणि समाजात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे अशा अनेक उद्देशांतून ‘बीट मार्शल’ ही संकल्पना राबविली जात होती. पण, या संकल्पनेत प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन पोलिस कर्मचारी गस्त घालत होते. तसेच त्यांना इतरही कामाची जबाबदारी देण्यात येत होती. ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत होता. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘कॉप 24’ उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button