Akkalkot : वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता ; स्टाफ वाढविण्याची नागरीकांची मागणी

अक्कलकोट (प्रतिनिधी) : अक्कलकोट तालुका ही महाराष्ट्र व कर्नाटक सिमावर्ती भागातील महाराष्ट्राच्या टोकावरील तालुका असून, कर्नाटक राज्यातील ही रुग्ण व शेजारच्या मराठवाडा प्रवेशद्वार याकडून ही रुग्णांची मोठी आवक आहे.

त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या अधिक वाढत असून, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अशोक राठोड, डॉ. निखिल क्षीरसागर यांनी तुटपुंज्या स्टॉपवर अहोरात्र रुग्ण सेवांसाठी झटत आहेत. ट्रॉमा केअर ही सुरु करण्यात आले असून, त्यांच्या सेवेचे मुल्यमापन व्हावे व श्रेणी वर्धन नुसार अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात आवश्यक कर्मचारी स्टॉप जिल्हा उप रुग्णालयास मिळावे अशी मागणी होत आहे.


याशिवाय ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन झाले आहे. ट्रामा केअर सुरु झाले मात्र याप्रमाणे आवश्यक कर्मचारी संख्या वाढलेली नाही. वैदकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय डॉ.अशोक राठोड व डॉ. निखिल क्षीरसागर गेल्या 15 ते 20 दिवस अखंड सेवा दिली आहे.

पंधरा ते वीस दिवसात ग्रामीण रुग्णालयात 24 तास सेवा केली असून, दररोज सुमारे 400 ते 500 ओपीडी होत आहे, तसेच दररोज सरासरी 30 प्रसुती केली जात आहेत. त्यांच्या अखंड 24 तास सेवेचे मुल्य मापन व्हावे व श्रेणी वर्धन नुसार आवश्यक कर्मचारी तात्काळ देणे गरजेचे आहे. अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.