गावगाथा

अन्वयी फाउंडेशन पुणे यांच्या वतीने वारकऱ्यांना प्रसाद वाटप…

लहानग्या अन्वयीला वारकऱ्यांनी दिला मायेचा आशीर्वाद

अन्वयी फाउंडेशन पुणे यांच्या वतीने वारकऱ्यांना प्रसाद वाटप…

लहानग्या अन्वयीला वारकऱ्यांनी दिला मायेचा आशीर्वाद

पुणे — पाऊले चालती पंढरीची वाट..टाळ, चिपळ्यांचा घणघणाट, मनामनात भक्तीरस निर्माण करणारा मृदंगनाद, अभंगावर डोलणारे वारकरी, हवेत फडफडणाऱ्या भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, कपाळी चंदनाचा टिळा, गळा तुळशी माळा आणि मुखी ज्ञानोबा, तुकोबाचा जयघोष असे भक्तीमय वातावरण. पालखी मार्गावरील रांगोळ्यांच्या पायघड्या, चौकाचौकांत साकारण्यात आलेल्या भव्य रांगोळी, रस्त्यांच्या दुतर्फा स्वागत करणारे बॅनर, फ्लेक्स आणि रंगीबेरंगी फुलांनी सजविलेले पालख्यांचे रथ दृष्टीपथास पडताच पुणेकरांनी मनोभावे घेतलेले दर्शन, अशा प्रसन्न व उत्साही वातावरणात भक्तीमय नाहून गेले..
वारकरी माउलींना एक सामाजिक बांधिलकी जपत अन्वयी फाउंडेशन पुणे यांच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले त्यावेळी जीच्या नावाने ही संस्था स्थापन करण्यात आले त्या कुमारी अन्वयी माळगे हिच्या हस्ते वाटप करण्यात आले .
या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सदाशिव माळगे सचिव भुवनेश्वरी माळगे तसेच प्रतीक्षा भगत आणि ओम भगत अशी अनेक मंडळी उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button