गावगाथाठळक बातम्या

Akkalkot : स्वामी समर्थ साखर कारखान्याला आग ; न्यासाच्या तत्परतेने अनर्थ टळला, वाचले तब्बल १०० कोटी

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट, (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिटणे येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शनिवारी सायंकाळच्या दरम्यान आग लागल्याचे कळताच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अग्निशामक वाहन तात्काळ पोहचल्याने मोठा अनर्थ टळला अन्यथा १०० कोटीचा साखर कारखाना जळून खाक झाला असता, “आग डोंब” अशी स्तिथी निर्माण झाली असती., न्यासाच्या अग्निशामक वाहनाने संपूर्ण आग विझवली असून, अन्नछत्र मंडळाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल सर्व थरातून कौतुक व स्वागत होत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

मिळालेली माहिती अशी कि शनिवारी सायंकाळच्या दरम्यान स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळ परिसरातील कुसळाला आग लागल्याने सदरची आग ही वाढत जाऊन साखर कारखान्यापर्यंत पोहचूलागल्याचे कळताच कारखान्यासमोरील कांही दुकान व हॉटेल चालकाने व तेथे कार्यरत असलेला सुरक्षा रक्षक बसवराज निंबाळे यांनी कारखान्याचे अध्यक्ष संजीवकुमार सिद्रामप्पा पाटील यांनी नगरपालिका अग्निशामक वाहन उपलब्द होण्याबाबत प्रयत्न केला परंतु आज शनिवार सुट्टीचा वार असल्याने संपर्क होऊ न शकल्याने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांना संपर्क साधल्याने त्यांनी तत्काळ न्यासाच्या अग्निशामक दलास संपर्क करून, न्यासाचे प्रशासनातील मुख्य संगणक लिपिक प्रसाद हुल्ले व अग्निशामक दल प्रमुख बिराप्पा व्हनझेंडे यांनी तत्काळ अग्निशामक दलाचे वाहन चालक सुरज कदम ला पाठविण्यात आले. 

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

यामुळे कारखाना परिसरात लागलेली आग कारखान्याजवळ येताच्या कांही क्षणी अन्नछत्र मंडळाच्या अग्निशामक वाहनाने तत्काळ विझवण्याचा प्रयत्न केला तो सफल झाला अनं मोठा अनर्थ टळला, अन्यथा १०० कोटीचा साखर कारखाना जळून खाक झाला असता, “आग डोंब” अशी स्तिथी निर्माण झाली असती. दोन दिवस आग विझली नसती अशी परिस्थिती निर्माण झाली असती अन्नछत्र मंडळाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल सर्व थरातून कौतुक व स्वागत होत आहे.

 

 

अन्नछत्र मंडळाने तत्परता दाखवली अन्यथा….!

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र या धार्मिकसह सामाजिक क्षेत्रात कार्याने आघाडी घेतली आहे. यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्य, परदेशात देखील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य पोहचले आहे. कार्यसिद्धी, तत्परता न्यासाच्या अग्निशामक दलाने दाखवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अन्यथा १०० कोटीचा साखर कारखाना जळून खाक झाला असता, “आग डोंब” अशी स्तिथी निर्माण झाली असती. न्यासाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल भोसले पिता-पुत्र यांचे ऋणी आहोत.

 

            संजीवकुमार सिद्रामप्पा पाटील

                अध्यक्ष

                   ्स्वा्मी समर्थ सहकारी साखर कारखाना लिमिटेड दहिटणे, ता. अक्कलकोट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button