Akkalkot: दिशा विहारात उभारण्यात येणाऱ्या श्री वटवृक्ष हनुमान मंदिराचे कोरे, पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

अक्कलकोट (प्रतिनिधी): शहरातील बासलेगाव रस्त्यावरील कोहिनूर मंगल कार्यालय शेजारी दिशा विहारमध्ये सुसज्ज उभारण्यात येणाऱ्या श्री वटवृक्ष हनुमान मंदिराचे भूमिपूजन शनिवारी उद्योगपती विलास कोरे, माजी प्रा. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्री स्वामी समर्थ औद्योगिक वसाहतचे चेअरमन राजशेखर हिप्परगी,
युवा नेते तथा उद्योगपती महेश शवरी, नगरसेवक नागराज कुंभार व स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे व्यस्थापक चंद्रकांत दसले यांची प्रमुख उपस्थिती होती.


पौरोहित्य गुड्डय्या स्वामी यांच्या मंत्रोच्चारात आणि हस्ते विधीप्रमाणे जागेची पूजा करून मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.

कोहिनूर मंगल कार्यालय शेजारी गृहनिर्माण वसाहतीचे मोकळी जमीन आहे. ज्यामध्ये सर्व रहिवाशांच्या निर्णयानंतर येथील मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. मंदिराच्या उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून येत्या वर्षभरात भव्य मंदिर उभारणीचे काम पूर्ण होणार आहे. सदर मंदिराची उभारणी लोकवर्गणीतून होणार असून भाविक भक्तांनी हे कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी सर्व भाविकांनी सढळ हाताने देणगी स्वरूपात मदत करण्याचे आवाहन श्री वटवृक्ष हनुमान मंदिराचे मुख्य संयोजक चंद्रकांत दसले व दिगंबर साळुंखे यांनी केले.
या कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक रमेश शिंदे, अध्यक्ष बसवराज आगरखेड, गुरव समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गुरव, उद्योजक बाबुराव विभूते, मल्लिकार्जुन पाटील, विरुपाक्ष कुंभार, अनिल शिंदे, सचिन डिग्गे, करसिध्द रोळी, गुरप्पा कुंभार, शांतविरप्पा दसले, बसवराज कुंभार, शंकर माळी व गोविंद शिंदे आदिसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.