Akkalkot: रथसप्तमी निमित्त अक्कलकोट बसस्थानकात प्रवाशांना तिळगुळ वाटप

अक्कलकोट (प्रतिनिधी): अखिल भारतीय ग्राहक पंचायत अक्कलकोट व बसस्थानक यांच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमी निमित्त तिळगुळ वाटप व गुणवंत कर्मचारी सत्कार कार्यक्रम साजरा झाला.

या प्रसंगी आगार प्रमुख रणजित साळवे,वाहतूक नियंत्रक श्रीमंत खसकी,ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अभिजित लोके,संघटक प्रशांत केसकर, सहसंघटक अभय शेटे, माजी संघटक शिवशरण अचलेर,सदस्य प्रसाद पाटील यांच्या हस्ते बसस्थानकात उपस्थित सर्व प्रवासी बंधू भगिनींना तिळगुळ वाटप करण्यात आले.

बसस्थानकातील गुणवंत कर्मचारी चालक अप्पू नडगेरी आणि वाहक आमिर शेख यांचा ग्राहक पंचायत वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक राजू माने,बागवान व कर्मचारी अनिल पाटील,गणेश पवार,शिवकुमार हत्तरसंग आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन कर्मचारी महेश गायकवाड यांनी केले.
