Akkalkot: संतांनी आचरणातून धर्माची संस्थापना केली – मौनतपस्वी जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी

अक्कलकोट (प्रतिनिधी): आपल्या भारतीय संस्कृतीच्या इतिहासात ऋषीमुनी व संतांनी आपल्या प्रत्येक आचार व विचारातून आध्यात्म व विज्ञानाचं चिंतन मांडलं, पण आपण फक्त संतांकडे चमत्कार म्हणूनच पाहतो ही दृष्टी बदलली पाहिजे. अत्रीऋषी, नृसिंह सरस्वती, श्रीपाद वल्लभ यांनी जी साधना केली त्या साधनेची शक्ती म्हणजेच श्री स्वामी समर्थ होय. येथील वटवृक्षाखाली शक्तीरुपाने श्री स्वामी समर्थ वास्तव्यास आहेत ते ठिकाण म्हणजेच तिर्थक्षेत्र अक्कलकोट होय. माणसाचे श्रेष्ठत्व त्याच्या कर्तव्यातून ठरते. धर्माकडे नितीनियम आणि कर्माच्या दृष्टिकोनातून स्वामींनी पाहिले आणि कर्तव्यातून धर्माचा प्रसार केला. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या वाट्याला आलेल्या कर्मानुसार धर्माचे आचरण केले तर समाजात मानव निर्मित प्रश्नच उद्भवणार नाहीत आणि याच्याचसाठी ऋषीमुनीनी व स्वामींनी जनसामान्यांना कर्तव्यपुर्तीचा धर्म सांगीतला त्यामुळे या दैवतरूपी संतांनी आपल्या आचरणातून हिंदू धर्म व संस्कृतीची संस्थापना केली असे अभिमानपुर्वक म्हणावे लागेल असे लेखी मनोगत कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्याच्या आळंद तालुक्यातील निंबाळ मठ संस्थानचे मठाधिपती मौनतपस्वी जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्यामार्गदर्शनाखाली समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे यांनी

मौनतपस्वी जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी

नमूद करताना मौनतपस्वी जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी आध्यात्म व हिंदू धर्मसंस्कृती बद्दलचे आपले विचार मांडले.

याप्रसंगी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, उद्योगपती समर्थ मसुती,

ऋषिकेश लोणारी, रविराव महिंद्रकर, महेश मस्कले, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, विपूल जाधव, जयप्रकाश तोळणूरे, अविनाश क्षीरसागर आदींसह स्वामीभक्त उपस्थित होते.