गावगाथाठळक बातम्या

PCMC Encroachment : पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कुदळवाडी, चिखलीतील अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा बुलडोझर ; स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर कायम

निगडी (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडी येथे अखेर अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडला आहे. महापालिकेने सहा दिवसांची मुदत देत अतिक्रमणे काढायला सांगितले होते.

ती मुदत शुक्रवारी (दि.७) संपली होती. त्यामुळे शनिवारी (दि.८) पहाटेच महापालिकेने कारवाईस सुरवात केली आहे.या कारवाईसाठी महापालिकेची पथकं पहाटेचं तैनात करण्यात आली. पोलिसांकडून कारवाईस्थळी जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. दिवस उजेडताच कारवाईचा बडगा उगरण्यात आला. परिसरातील नागरिकांना काही काळण्यापूर्वी हातोडा पडल्यानं गेल्या आठवड्याप्रमाणे तणाव टळला. 

 

भंगार दुकाने, गोदामे, कंपन्या, हॉटेल, वर्कशॉप्स, बेकरी दुकानदार या व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेडवरील कारवाईला पहाटेपासूनच सुरवात केली आहे.कुदळवाडी परिसरात मोठ्या संख्येने अनधिकृत भंगार दुकाने आणि गोदामांसह इतर व्यावसायिक आस्थापना आहेत. या भागात वारंवार आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील ५ हजार अनधिकृत आस्थापनांना महापालिकेच्या ‘क’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने नोटीसा बजावल्या आहेत. कारवाईला घेऊन स्थानिकांमध्ये नाराजीचा सुर मात्र कायम आहे. 

शनिवारी (दि.८) पहाटेच महापालिकेने कारवाईस सुरवात केली आहे. या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button