महादासोही कलबुर्गी शरणबसप्पा यांच्या जीवन चरित्रावरील दहा दिवशीय पुराण व प्रवचनाचे उद्घाटन हत्तीकणबस मठाचे मठाधिपती श्री. प्रभुप्रशांत महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले.
आझाद गल्लीतील श्री अक्कमहादेवी प्रतिष्ठापनाच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त

अक्कलकोट, दि. १५- येथील आझाद गल्लीतील
श्री अक्कमहादेवी प्रतिष्ठापनाच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त
विरक्त मठाचे मठाधिपती श्री.म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली
उमराणी येथील श्री. मृगेंद्र शास्त्री यांच्या अमृतवाणीने आणि संगीत-वीरपाक्षय्या गौडगाव, तबला- बसवराज आळंद यांच्या साथसंगतीने घाणदेवी मैदानावरील
आयोजित
महादासोही कलबुर्गी शरणबसप्पा यांच्या जीवन चरित्रावरील दहा दिवशीय पुराण व प्रवचनाचे उद्घाटन हत्तीकणबस मठाचे मठाधिपती श्री. प्रभुप्रशांत महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी समाजसेवक मल्लिनाथ स्वामी, ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर चे अध्यक्ष शिवलिंगय्या स्वामी, समाजसेविका मल्लमा पसारे, सुनंदा तेली, संजय समाने, अक्कमहादेवी मंदिराचे अध्यक्ष अध्यक्ष श्रीशैल भरमशेट्टी, माजी नगरसेवक शशिकांत बकरे,
वेदमूर्ती बसवराज शास्त्री आदी उपस्थित होते.

प्रवचनकार श्री मृगेंद्र शास्त्री बोलताना म्हणाले,
समाजात सुख आणि समाधान मिळविण्यासाठी भक्तगणांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी त्यांना त्यात यश मिळाले नाही. म्हणून आपले जीवन लोककल्याणासाठी वाहिले आहे. त्यामुळे आपणही आपले कार्य आणि कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे. आपल्याला जो मार्ग योग्य वाटतो, ती निष्ठेने चालावा. या महापुराण कथेत जीवनाचे सारं असल्याचे सांगितले.

श्री प्रभुप्रशांत महास्वामीजी यांनी उपस्थित भाविकांना धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन चांगले संस्कार घेऊन आपले जीवन सार्थकी लावावेत. तसेच दररोज विभूती लावण्यासाठी आणि लिंग पूजा करण्याबरोबरच समाजसेवा करण्यासाठी वेळ देण्याचे आवाहन केले.

यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष शिवशंकर चनशेट्टी, सचिव लक्ष्मण समाने, विश्र्वस्त सुभाष आंदोडगी, देविदास कवटगी, संतोष लंगोटे, रविंद्र बंकापूरे, नारायण कदम, सुभाष पेठकर, शरणप्पा काडरामे, विश्वनाथ माळी, राजकुमार कांदे, सिध्दाराम स्थावरमठ, सचिन स्वामी, बाबुराव बोलदे,
श्री रेणुकाचार्य अक्कनबळग भजन मंडळ, तसेच समस्त आझाद गल्ली, माळी गल्ली,बसवेश्वर नगर,राजीव नगर, शिवसम्राट चौक व शहर परिसरातील सर्व सदभक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
