
घोळसगाव येथे अंगणवाडीच्या चिमुकल्यांने घेतला वनभोजनचा आनंद

घोळसगाव मध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस मिळून पहिल्यांदाच आरिफ दिवटे या फळ पीक बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वनभोजनासाठी सर्व चिमुकल्यांना घेऊन गेल्या सर्व मुले आनंदाने शेतामध्ये जेवण केले तसेच दिवटे यांच्याकडून मुलांना खाण्यासाठी फळे व खाऊ वाटप करण्यात आले तसेच मुलांना येण्या जाण्यासाठी पालक महेश किवडे व रवींद्र किवडे यांनी वाहनाची सोय करून दिले मुलांना शेती व फळे याच्याबद्दल व्हॅनाळे मॅडम यांनी माहिती दिले वनभोजनाचे नियोजन सेविका रेखा व्हॅनाळे भौरम्मा पाटील निर्मला मेणसे श्वेता धरणे किशोरी वैभवी स्वाती व शिवकुमार यांनी केले तसेच सर्व मुले विविध खेळ खेळत गाणे गात वनभोजनाचा उपक्रमामध्ये सहभागी झाले
