
*वाबळेवाडीत शाळेत विद्यार्थ्यांनी केले अवकाश निरीक्षण*
(पुणे प्रतिनिधी)
महाराष्ट्रात उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाबळेवाडी शाळेत गुरुवार, 13 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत वाबळेवाडी प्राथमिक शाळेत आयुका पुणे येथील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स – आययूसीए उर्फ मिस्टर टेलिस्कोप टेक्निशियन. वाबळेवाडीच्या पहिली ते आठवपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रूपेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवकाश निरीक्षण केले. यात पालक व ग्रामस्थ आणि शिक्षकांनीही भाग घेत अवकाश निरीक्षणाचा आनंद घेतला.
सर्व विद्यार्थ्यांसह पालकांनी गॅलिलियन (अपवर्तन) दुर्बिणी आणि न्यूटोनियन (परावर्तन) दुर्बिणीने सुसज्ज दोन दुर्बिणींमधून शुक्रकोर,
तांबूस रंगाचा मंगळ ग्रह,
चंद्रावरील तपशील आणि
गुरु ग्रह आणि त्याचे चार उपग्रह यांचे निरीक्षण केले.
2025 च्या सुरुवातीला रात्रीच्या आकाशात ग्रहांची परेड. प्लॅनेटरी परेड म्हणजे जेव्हा आपल्या सौर मंडळातील अनेक ग्रह एकाच वेळी रात्रीच्या आकाशात दिसतात. यावेळी शुक्र, मंगळ, गुरु, शनि, नेपच्यून आणि युरेनस असे सहा ग्रह दिसतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, उत्सुकता, सर्जनशीलता आणि संशोधन या गोष्टी निर्माण होतात.
