राष्ट्रीय पर्यटन परिषदेस सहकार्य केल्याबद्दल सी.बी.खेडगी महाविद्यालयाच्या वतीने महेश इंगळे यांचा सन्मान.
सी.बी.खेडगी कॉलेजचे प्राचार्य शिवराया आडवितोट यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून महेश इंगळे यांचा गौरव.

राष्ट्रीय पर्यटन परिषदेस सहकार्य केल्याबद्दल सी.बी.खेडगी महाविद्यालयाच्या वतीने महेश इंगळे यांचा सन्मान.

सी.बी.खेडगी कॉलेजचे प्राचार्य शिवराया आडवितोट यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून महेश इंगळे यांचा गौरव.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, ) – येथील सी.बी.खेडगी महाविद्यालयात प्रॉब्लेम अँड प्रोस्पेक्टस् ऑफ टुरिस्म डेव्हलपमेंट इन इंडीया आणि इन व्यू ऑफ सस्टेनेबल मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स या मुख्य पर्यटन विषयांवर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद नुकतेच संपन्न झाले. या राष्ट्रीय पर्यटन परिषदेस श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे मनोगत सी.बी.खेडगी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवराया आडवितोट यांनी व्यक्त केले. आज येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कार्यालयात प्राचार्य शिवराया आडवितोट यांनी महेश इंगळे यांच्या विशेष सहकार्याप्रित्यर्थ महेश इंगळे यांचे शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देवून विशेष गौरव कार्य केले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य शिवराया आडवितोट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना प्रा.शिवराया आडवितोट यांनी सदरहू राष्ट्रीय पर्यटन परिषदेस देशभरातून उपस्थित राहिलेल्या शंभर प्राध्यापक व विद्यार्थ्यांची महेश इंगळे यांनी दोन दिवस भोजन व निवासाची व्यवस्था करून आध्यात्मिक, सामाजिकते सोबतच शैक्षणिक क्षेत्रावरील निष्ठाही अत्यंत नम्रपणे जोपासली आहे. अशा सहकार्याची भावना त्यांच्या व्यक्तीमत्वात आणखीन वृद्धींगत होत रहावी याकरीता श्री स्वामी समर्थांच्या चरणी वंदन करून प्रार्थना केले. त्यांच्या या सहकार्याचे सी.बी.खेडगी महाविद्यालय व मी व्यक्तीश: अत्यंत ऋणी आहोत आणि या ऋण व्यक्त करण्याच्या हेतूनेच आज येथे महेश इंगळे यांचा सी.बी.खेडगी महाविद्यालयाच्या वतीने सन्मानचिन्ह देवून गौरव केला असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य शिवराया आडवीतोट, उदगीर कॉलेजचे प्राचार्य डॉ.बसवराज वेळापूरकर, डॉ.भैरप्पा कोंणदे, डॉ.अंकुश शिंदे, मा.प्रा. शिवशरण अचलेर सर, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – महेश इंगळे यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करताना प्रा.शिवराया आडवितोट, डॉ.बसवराज वेळापूरकर, डॉ.भैरप्पा कोंणदे, डॉ.अंकुश शिंदे,
मा.प्रा.शिवशरण अचलेर दिसत आहेत.
