संस्थानिकांचे कार्य कसे असावे हे महेश इंगळे यांनी वटवृक्ष संस्थानच्या माध्यमातून दर्शविले आहे – श्रीमंत संजीवराजे
संजीवराजे नाईक-निंबाळकर व श्रीमंत शिवांगलीराजे नाईक-निंबाळकर यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.

संस्थानिकांचे कार्य कसे असावे हे महेश इंगळे यांनी वटवृक्ष संस्थानच्या माध्यमातून दर्शविले आहे – श्रीमंत संजीवराजे

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.१८/०२/२०२५)
आपल्या भारत देशाचे राज-कार्य हे संस्थानानिकांपासून सुरूवात झाले आहे. गेल्या अनेक शतकांपासून अनेक संस्थानांचा वारसा आपल्या देशाला लाभला आहे. या संस्थानांच्या माध्यमातून देशातील राजघराणे असो अथवा देवस्थाने त्यावर काम करणाऱ्या प्रमुखांच्या विनयशील व्यक्तीमत्वावर त्या संस्थानांची कार्यप्रणाली प्रचलित असते. या विनयशील व्यक्तीमत्वाच्या माध्यमातूनच फलटणकरांचे आणि नाईक-निंबाळकर राजघराण्याचे अतुट ऋणानुबंध आहेत. या अनुशंगाने
येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त संस्थानचे प्रमुख महेश इंगळे यांनीही आपल्या स्वामी सेवेतून असेच ऋणानुबंध येणाऱ्या स्वामी भक्तांसोबत जोपासली आहे ही बाब स्वामी सेवेच्या हेतूने वंदनीय आहे, म्हणून संस्थानिकांचे कार्य कसे असावे हे महेश इंगळे यांनी वटवृक्ष संस्थानच्या माध्यमातून दर्शवित असल्याचे मनोगत
१२०० वर्षांचे ऐतिहासिक वारसा लाभलेले फलटण राजघराण्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच त्यांचे सुविद्य पत्नी श्रीमंत
शिवांगलीराजे नाईक-निंबाळकर तसेच
उमेशभैय्या नाईक-निंबाळकर यांच्या समवेत येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी श्रीमंत
संजीवराजे नाईक-निंबाळकर व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत शिवांगलीराजे नाईक-निंबाळकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. या प्रसंगी प्रथमेश इंगळे, उमेशभैय्या नाईक-निंबाळकर, देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, तुषार मोरे इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – संजीवराजे नाईक-निंबाळकर व श्रीमंत शिवांगलीराजे नाईक-निंबाळकर यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
