श्री शहाजी हायस्कूलमधील सन १९८२-१९८३ या वर्षाच्या विद्यार्थी- विद्यार्थिनीचा स्नेहमेळावा बळोरगी फार्म हाऊसवर मोठ्या उत्साहात पार पडला
स्नेह मेळावा

अक्कलकोट, दि. १८- येथील मराठा मंदिर मुंबई संचलित श्री शहाजी हायस्कूलमधील सन १९८२-१९८३ या वर्षाच्या विद्यार्थी- विद्यार्थिनीचा स्नेहमेळावा बळोरगी फार्म हाऊसवर मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यानिमित तब्बल ४२ वर्षांनी वर्ग मित्र एकत्र आले आहे. अध्यक्षस्थानी सोलापूरचे डॉ. सुहास पुजारी हे होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अशपाक बळोरगी उपस्थित होते.

यावेळी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात राहून उसाच्या रसाची चव आणि हरभरा दहाळचे स्वाद बरोबरच गरमागरम हुरडा पार्टी व रुचकर जेवण करीत जुन्या आठवणीना उजाळा दिला आहे. वर्गमित्र मैत्रीने तब्बल ४२ वर्षानंतर एकत्र येत एक प्रकारची मनमोकळेपणाने आनंद साजरा केला. वर्गमित्र अनेक वर्षापासून इच्छा असतानाही येऊ शकत नव्हते काही जण गावातील असल्याने काहींची भेट होत होती. तर काही विद्यार्थी नोकरी, कामानिमित्त शहरात, बाहेरगावी स्थाईक झाले होते. परंतू सोशल मीडियाच्या माध्यमातून दुरावलेले वर्गमित्र आले. प्रत्यक्ष वर्ग मित्राची भेट व्हावी म्हणून काही मित्रांनी व्हाट्सअॅपच्या माध्यमातून एकत्र आले.

यावेळी संयोजक एजाज बळोरगी, मल्लिकार्जुन मसुती, सुरेश पुजारी, सुधाकर महिंद्रकर, डॉ. आसावरी पेडगावकर, मनोज लच्याणकर, प्रदीप हिंडोळे, संतोष जिरोळे, निवास इंगळे, सुरेश वेदपाठक, मीना पाटील आदी उपस्थित होते.

चौकट —
*मास्तराच्या छडीची आठवण*

उलटबाज, अवघळ वयातील खोडकरपणा केलेल्या चुका, शिक्षकांचा खाल्लेला राग, परीक्षेत मिळालेले यश अपयश, तसेच काही प्रसंगी मिळालेला इडीचा मार आंबट गोड आठवणीत शिरताना हे पंच्चावनातील तरूण खाकी हाप पॅन्टच्या खिशात कधी रमले त्यांचे त्यांना कळले नाही. या मित्रांपैकी शेती, शिक्षण, व्यापार, उद्योग, व्यवसाय, राजकारण, भक्ती संप्रदाय अशा विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत.
