
सेंट टेरेसा शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल येथे १ मे महाराष्ट्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.शाळेचे सी ई ओ फादर शीनोय, उपमुख्यध्यापिका रोझ लोबो आदी मान्यवर उपस्थित होते.पर्यवेक्षक सर फिलिप रॉड्रिग्ज यांनी महाराष्ट्र कसा उदयाला आला, कोणी कोणी राज्य घडविण्यात योगदान दिले या बद्दल माहितीतून आढावा घेतला तर कश्यप तांबे या नववीतील विद्यार्थ्याने महाराष्ट्र रज्याबद्दल माहिती सांगितली.शिक्षकांनी जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत गायले.शाळेतील सहावी कमिटीने कार्यक्रम आयोजित करण्याची यशस्वी जबाबदारी घेतली..यावेळी कार्यक्रम पाहण्यासाठी शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका भावना वैती यांनी केल.
