
पारंपरिक वेषभूषा आणि मैदानी खेळ सादरीकरणा आणि रॅलीने शिवजन्मोत्सव साजरा

(मुरुम प्रतिनीधी, ता.१९)

येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शिवजयंती निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनाधीष्टीत पुतळ्याचे पूजन आणि शिवआरती भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर जाऊ ब्रिगेडच्या महिलांनी जिजाऊ वंदना सादर केली. यावेळी भारत शिक्षण संस्थेचे संचालक राजेंद्र माने, रमेश बिराजदार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील शस्त्रांच पूजन करून युवकांनी , विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी लाटी -काठी आणि तलवारबाजीचे तसेच पारंपरिक वेशभूषेचे सादरीकरण केले. महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या वतीने शिव गीतांचे सादरीकरण केले. शहरातील जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ महिला आणि पदाधिकारी, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रॅलीचा शुभारंभ बाळासाहेब माने, शांतकुमार मोरे, अनिल सगर, भास्कर वैराळ अमर देशेटवार, पत्रकार अंबादास जाधव, प्रा व्ही एम पाटील, अंबादास जाधव, उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ पद्माकर पिठले, उपप्राचार्य गुंडा बापू मोरे,पर्यवेक्षक शैलेश महामुनी, प्रबंधक राजकुमार सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक नितीन कोराळे डॉ डी एस चितमपल्ले यांच्या उपस्थितीमध्ये झाला. या रॅलीचा समारोप श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला. यावेळी घेतलेल्या लाठी-काठी स्पर्धेमध्ये अजिंक्य राजे अमोल पाटील यांनी प्रथम क्रमांक, तर द्वितीय क्रमांक छावा ग्रुपच्या रफिक शेख यांच्या चिमुकल्याणी पटकावला. तर तिसरा क्रमांक गौरव कटके या विद्यार्थिनींनी मिळवला. पारंपरिक वेशभूषा स्पर्धेमध्ये श्री छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेतील तेजस दंडगे यास प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक जिजाऊच्या वेशभूषेतील कु. माधुरी अगडे आणि कु. विद्या सधाने, तर तिसरा क्रमांक कु. ऋतुजा जीवनगे यांना देण्यात आला. मावळ्याच्या वेशातील विशेष पुरस्कार सुशील सूर्यवंशी यांना तसेच प्राथमिक शालेय स्तरावरील उत्तेजनार्थ बक्षीस कु स्वराली बिराजदार आणि कु मानसी घोडके या चिमुकलीना देण्यात आला. श्री अमोल पाटील यांनी सादर केलेल्या दांड पट्ट्याला विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
लाठी -काठी दांडपट्टा आणि तलवारबाजी अशा मराठमोळ्या मैदानी खेळाची जनजागृती गावागावातील तरुण आणि तरुणींमध्ये व्हावी आणि सक्षम तरुण व्हावे. यासाठीच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमधील यशस्वी स्पर्धकांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी केले आहे. यावेळी जॉब ब्रिगेडच्या जिजाऊ ब्रिगेडच्या शिवमती सुनंदाताई माने मंजुषा चव्हाण रेखाताई पवार संध्याताई शिंदे तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी व युवतीने शिवरायांच्या पालखी आणि घोड्यासह मिरवणुकीत मोठा सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच आभार प्रदर्शन शांतकुमार मोरे यांनी केले.
