
छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा! ……. बसवराज पाटील

(मुरुम प्रतिनीधी ता.१९)

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त जिजामाता उद्यान, धाराशिव येथे शिवमूर्ती पुजन केले.

महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक, स्वराज्याचे संस्थापक, आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यात आणि देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या सोहळ्यात उपस्थित शिवप्रेमी बांधवांना शुभेच्छा देत, छत्रपतींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला. शिवचरित्राच्या प्रेरणेने, स्वराज्याच्या मुल्यांनी आणि न्यायप्रिय व्यवस्थेने समाज घडवूया असा संकल्प केला.

यावेळी प्रसंगी पोलीस अधिक्षक संजय जाधव,विश्वास शिंदे,ॲड.व्यंकटराव गुंड,मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती संस्थापक अध्यक्ष प्रकाश जगताप,जेष्ठ पत्रकार अंबादास दानवे,विलास लोकरे,नागेश जगदाळे,बाळासाहेब शिंदे,मा.नगराध्यक्ष मधुकर तावडे,विनोद गपाट,मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष संदीप इंगळे,मा.नगराध्यक्ष सुनील काकडे,मा.नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे,धनंजय राऊत,शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.