Breaking : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसह बंधूंना २ वर्षांसाठी कारावासाची शिक्षा ; आमदारकीही धोक्यात…? वाचा काय आहे प्रकरण…

नाशिक (प्रतिनिधी ): नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटें आणि त्यांचे बंधू सुनिल कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने कोकाटे यांना सुनावली आहे. 1995 साली कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळी यांनी याविरोधात याचिका दाखल केली होती. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता.


नेमक प्रकरण काय?
1995 ते 1997 सालचं हे प्रकरण असून, कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की, आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. 1995 साली कोकाटे हे आमदार होते तर, दिघोळे हे मंत्री होते. गेल्या अनेक वर्षांपासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वाद सुरू होता.

मंत्रीपद अन् आमदारकी धोक्यात
लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात धाव घेत स्थगिती घेतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, जर वरच्या न्यायालयाने सत्र न्यायालायने सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती न देता ती कायम ठेवल्यास कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रीपद जाऊ शकते.