सोलापूर (प्रतिनिधी): पुणे – सोलापूर – पुणे रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता हुतात्मा एक्स्प्रेसमधून रिझर्व्हेशन न करता ऐनवेळी जनरल तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. कारण तीन आरक्षित डब्यात बदल करून त्याऐवजी तीन डबे जनरल करण्यात येणार आहे. यातून सर्वसामान्य २३५ प्रवाशांना अनारक्षित (जनरल) तिकिटावर प्रवास करता येणार आहे. येत्या २१ नोव्हेंबरपासून सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेसला हा निर्णय लागू होणार असून, सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हुतात्मा एक्स्प्रेला साधारण डब्यांची संख्या वाढवण्यासाठी सातत्याने मागणी होत होती. अखेर ती मागणी रेल्वे प्रशासनाने पूर्ण केली आहे.
हुतात्मा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे डी ९, डी १० आणि डीएल १ (एसएलआर) हे डबे जनरल डबे म्हणून धावणार आहेत. हुतात्मा एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. उशिरा का होईना रेल्वे प्रशासनाने जनरल डब्यांची घोषणा केल्याने प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाचे अभिनंदन करीत आभार व्यक्त केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!