स्वामींच्या प्रसादरूपी खुराकाचे ७७ कुस्तीगीरांना वाटप
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव करणाऱ्या गोरगरीब कुस्तीगीरांसाठी स्वामींच्या प्रसादरूपी खुराकाचे कीट वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सप्टेंबर महिन्यातील ७७ कीटचे वितरण करण्यात आले.
तालुक्यातील जे पैलवान कुस्ती सरावासाठी कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आदी ठिकाणी आहेत, अशा कुस्तीगीरांसाठी न्यासाकडून गत मकरसंक्रांतीच्या दिवशी (जानेवारी महिन्यात) हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. प्रारंभी ५० जणांना कीट देण्यात आले होते.
गेली ३८ वर्षे अखंड अन्नदानाचे कार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे न्यास संपूर्ण देशात ख्यातनाम आहे. संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे कार्य अधिक व्यापक झाले आहे. अन्नछत्र मंडळात दररोज लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.
“समर्थ महाप्रसाद” या सेवेबरोबरच आता तालुक्यातील गोरगरीब कुस्तीगीरांसाठी प्रसादरूपी खुराकाचे मासिक वाटप न्यासाकडून करण्यात येत आहे. या कीटमध्ये तूप, बदाम, खारीक, बडीसोप, खसखस, इलायची, धने आदी पौष्टिक वस्तूंचा समावेश आहे.
तालुक्यातील कुस्तीगीरांचा सर्वे करून ७७ पैलवानांची निवड करण्यात आली असून, यासाठी महाराष्ट्र केसरी पै. मौला शेख बादोला, पै. महेश कुलकर्णी, सरफराज शेख, अतिश पवार यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी न्यासाचे सचिव शामराव मोरे, मैनुद्दीन कोरबू, बाळासाहेब पोळ, गोटू माने, प्रवीण घाटगे, शहाजी यादव, एस.के. स्वामी, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, शिव स्वामी, राजेंद्र झंपले, मलंग मकानदार, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, रोहित कदम, पिंटू हळ्ळूरे, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी आदी सेवेकरी, कर्मचारी व भक्तगण उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!