गावगाथा

*स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर*

पुरस्कार वितरण सोहळा

*स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर*

तळमावले/वार्ताहर
महाराष्ट्र शासन, मान्यताप्राप्त सहाय्य धर्मादाय आयुक्त संलग्न व आयएसओ मानांकनप्राप्त पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, वैद्यकीय, उद्योग, कृषी व क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड देवून गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे स्वरुप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ, गमजा आणि कोल्हापूरी फेटा असे आहे.
2025 मधील पुरस्काराची घोषणा ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष संदीप डाकवे यांनी केली आहे. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ.रेश्मा डाकवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून यासंदर्भात प्रस्ताव मागवण्यात आले होते. आलेल्या 300 प्रस्तावामधून 35 व्यक्ती व संस्था यांची निवड करण्यात आली आहे.
सदरील पुरस्काराचे हे सातवे वर्ष असून विभाग आणि पुरस्कार्थी पुढीलीप्रमाणे, अध्यात्मिक विभाग : महंत आहिल्यागिरीजी महाराज, कला विभाग : दिग्ददर्शक अरुण कचरे, सिनेअभिनेत्री प्राजक्ता नवनाळे, सिनेअभिनेते योगेश पोवार, बालअभिनेता श्लोक डिसले, कु.माधुरी करपे (कथ्थक आर्टीस्ट), महेश मस्कर, शैक्षणिक विभाग : सौ.अलका ढवळे, जया पाटील, सौ.प्रतिभा खिलारे, प्रतिभा गोसावी, सचिन जाधव-सौ.दिपाली जाधव (जयहिंद करिअर अकॅडमी), नितीन पवार, पल्लवी निकम, मिनाक्षी सावंत , डाॅ.हणमंत सूर्यवंशी, प्रगतषील युवा शेतकरी प्रदीप कोंडीबा शेलार, सामाजिक विभाग : विजय कदम, सुधीर जगदाळे, गणेश वारंगे, ललिता कांबळे, अक्षय चव्हाण, उद्योजक विभाग : रामचंद्र कोळेकर, सौ.मृदूला माळी, राजेश साळुंखे, माया निकम-विश्वजित निकम (हाॅटेल गोविंदा), जयभीम कांबळे, सौ.प्रिया यादव (हाॅटेल रायाज), वैद्यकीय विभाग : धमेंद्र मगरे, (चैताली लॅबोरेटरी), डाॅ.सुनिता चव्हाण, साहित्यिक विभाग : प्रा.रेखा दिक्षीत, विजया पाटील स्व.बाबुराव गोखले ग्रंथालय सैदापूर, डाॅ.विनायकराव जाधव, राजकीय विभाग : सौ.संज्योती जगताप, सौ.अलका तावरे, पत्रकारिता विभाग : ओमकार धुळप (गणेशोत्सव उत्कृष्ट वार्तांकन), ज्ञानेश्वर शेवाळे यांचा प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड ने सन्मान केला जाणार आहे.
सीए परीक्षेत उज्जवल यश मिळवल्याबद्दल अधिक तानाजी डाकवे यांचा विशेष मानपत्र देवून सन्मान केला जाणार आहे. सांची रेश्मा संदीप डाकवे हिच्या नावे ठेवलेल्या ठेवपावतीच्या व्याजातून न्यू इंग्लिश स्कूल काळगांव येथे इ.10 वीत मुलींमध्ये प्रथम आलेल्या कु.वैष्णवी नितीन पाटील हिचा स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, रोख रक्क्म रु.1,000/-, सन्मानपत्र आणि ‘तात्या’ हे पुस्तक देवून गौरव करण्यात येणार आहे.
याशिवाय याच कार्यक्रमात राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कारप्राप्त लेखक आणि पुस्तकांची नावे (कंसात) पुढीलप्रमाणे: डाॅ.प्रभाकर शेळके (डबल ढोलकी), प्रा.विश्वजित जाधव (आठवणींच्या सावल्या), दिव्या बाबर (शब्दांच्या वाटेवर), प्रा.रत्नमाला शिंदे-स्वामी (गुंफण), दिनेश फडतरे (रॅंडम), रेखा दीक्षित (मौनातला चाफा), सौ.सविता माने (वृंदावनातील महानंदा), चंद्रकांत पोतदार (प्रहाराच्या एैरणीवर), शरद अत्रे (रंग निसर्गाचे), दत्तात्रय शिवराम हिर्लेकर-गुरुजी (कर्तव्यपूर्ती), प्रा.अलका सपकाळ (फुलांची शाळा), सौ.आरती लाटणे (टेक ऑफ काशी यात्रा), सौ.शीला माने (देश-विदेशी खेळांची रुपरेषा), विनायक कुलकर्णी (आभार वेदनांचे), सत्यवान मंडलिक (स्वातंत्र्याची 75 वर्षे), सौ.अलका कोठावदे (सैताणी त्रिकोण), सौ.अनिता गोरे (क्रांतीयोध्दा), सोमनाथ आवडाजी पगार (कारुण्यबोध), डाॅ.सुनिता चव्हाण (इच्छामरण), पंढरी बनसोडे (आक्रोश), प्रा.इंद्रजीत पाटील (चिबाड), सचिन पाटील (फक्कड), विक्रांत केसरकर (संगतिचो शिमगो), अंजली गोडसे (ओंजळीतला चंद्र)
तसेच ‘सेल्फी विथ गुढी’ या स्पर्धेत माधुरी सुर्यकांत जाधव (उंब्रज), छाया दुर्योधन पारेकर (काळेवाडी), सुनील पवार (चाफळ) यांना अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक देण्यात आला आहे. अनिल देसाई (तळमावले यांना विशेष प्रावीण्य पारितोषिक देण्यात आले आहे. या विजेत्या स्पर्धकांना पुस्तक आणि अभिमानपत्र देण्यात येणार आहे.
स्व.राजाराम डाकवे (तात्या) निबंध स्पर्धेत स्वाती पांडूरंग कुंभार (वाळी-पुणे), गायत्री यशवंत चाळके, आत्माराम जाधव (सुपने-पुणे) यांना अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक देण्यात आला आहे. डाॅ.राजेश जोशी (सातारा), जितेंद्र शंकर चौधरी (वाई) यांना विशेष प्रावीण्य पारितोषिक देण्यात आले आहे. प्रथम तीन क्रमांकाना आकर्षक स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पुस्तक तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम शनिवार दि.25 ऑक्टोबर, 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृह, कराड, ता.कराड, जि.सातारा येथे होणार आहे. तरी याप्रसंगी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button