भारतीय सैन्यदलातील सेवापुर्तीमुळे मेजर माने यांचे जीवन सार्थ – प्रथमेश इंगळे
मेजर नारायण (अमोल) माने यांच्या सेवापुर्ती प्रित्यर्थ स्विमींग ग्रुप व महेश इंगळे-प्रथमेश इंगळे मित्रपरिवारच्या वतीने सन्मान.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.१०/१०/२०२५)
भारतीय सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना अनेक खडतर प्रवासातून जावे लागते. तेव्हा कुठेतरी या उमेदवारांना भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी करून दिले जाते. अत्यंत खडतर मार्गातून आलेल्या या सर्व जवानांना भारत मातेच्या संरक्षणाचे महत्त्व पूर्वीपासूनच माहीत असले, तरी देखील प्रशिक्षणा दरम्यान या सर्व गोष्टी शिकविल्या जातात. त्यामुळे हे जवान अतिशय स्फूर्तीने कार्य करत असतात. यापैकीच आपल्या तालुक्यातील दहिटणे गावचे सुपूत्र मेजर नारायण (अमोल) माने हे देशाच्या पंजाब, राजस्थान, उरी, जम्मू कश्मिर, हैद्राबाद, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश इत्यादी विविध ठिकाणी भारतीय सैन्यदलातून देशातील विविध भागात सलग १७ वर्षे देशसेवा करून नुकतेच सन्मान पुर्वक सेवानिवृत्त झाले आहेत. अत्यंत खडतर अशा भारतीय सैन्यदलातील सेवापुर्तीमुळे मेजर माने यांचे जीवन सार्थ झाले असल्याचे मनोगत
येथील स्विमींग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे सुपूत्र प्रथमेश इंगळे यांनी व्यक्त केले.
आज शहरातील लोकापूरे हॉल येथे मेजर नारायण (अमोल) माने यांच्या भारतीय सैन्यदलातील सेवापुर्ती निमीत्त येथील स्विमींग ग्रुप व महेश इंगळे – प्रथमेश इंगळे मित्र परिवारच्या वतीने महेश इंगळे यांच्या हस्ते मेजर नारायण (अमोल) माने व त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी स्वाती अमोल माने यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी मेजर नारायण (अमोल) माने यांच्या भारतीय सैन्यदलातील राष्ट्रसेवेस अध्यक्षीय मनोगतावरुन संबोधीत करताना प्रथमेश इंगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात मेजर अमोल माने, महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी कार्यक्रमाचे सर्व मान्यवर व स्विमींग सदस्यांसह श्री स्वामी समर्थांची महानैवेद्य आरतीस उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यानंतर मेजर अमोल माने यांची श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ते लोकापूरे हॉल दरम्यान महेश इंगळे-प्रथमेश इंगळे व स्विमींग ग्रुप सदस्यांच्या सहभागाने शहरातून सवाद्य भव्य मिरवणूक सोहळा संपन्न झाला. यावेळी चौका चौकात फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली. दरम्यान व व्यासपीठावर शहरातील अनेक नागरिकांनी मेजर अमोल माने यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील जीवन वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.नगरसेवक मिलन दादा कल्याणशेट्टी,
निलकंठ हिंडोळे, महाराष्ट्र माळी महासंघ तालुका अध्यक्ष संतोष पराणे, आर.पी.आय. तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, दहिटणचे सरपंच नितीन मोरे, उपसरपंच विकी बाबा चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजीत दादा पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिलीप भाऊ सिध्दे, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, शिंदे गट शिवसेना तालुका अध्यक्ष बाबा पाटील, ठाकरे गट शिवसेना तालुका अध्यक्ष आनंद बुक्कानूरे, शरद पवार गट राष्ट्रवादी अध्यक्ष बंदेनवाज कोरबू, सुनिल भाऊ सिध्दे, सोलापूर सेवासदन प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका मानसी दामले मॅडम हे व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत मातेच्या व श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवर प्रमुख पाहूणे मिलन दादा
कल्याणशेट्टी, प्रथमेश इंगळे, मल्लिकार्जुन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीं राष्ट्रगीतही मोठया भक्ती भावाने संपन्न झाला. यावेळी स्विमींग ग्रुप व महेश मालक इंगळे मित्र परिवारच्या वतीने महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी सर्व मान्यवर प्रमुख पाहूण्यांचा व मेजर अमोल माने यांच्या परिवारातील वडील विलास माने, आई पुष्पा माने, काका दत्ता माने, काकू निर्मला माने, भाऊ संतोष माने, वहिनी वैशाली माने यांचाही श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी स्विमींग ग्रुपचे सदस्य व पत्रकार अरविंद पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त अरविंद पाटील यांचा महेश इंगळे यांच्या हस्ते तर श्री वटवृक्ष देवस्थानचे विश्वस्त तथा करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती संपतराव शिंदे यांना यश कल्याणी सेवाभावी संस्था पुणे यांच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल मा.नगरसेवक मिलन दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, पुष्पगुच्छ देवून सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी स्विमींग ग्रुपचे सदस्य सचिन किरनळ्ळी, सुनिल कटारे, विश्वनाथ देवरमनी सर, विद्याधर गुरव सर, सुरेश वाले सर, अंकूश केत, बाळासाहेब एकबोटे, अशोक कलशेट्टी, सुनिल पवार, बाबा मालक सुरवसे, शेखर आडवितोटे, मनोज इंगुले, संतोष पराणे, संतोष जवळगी, श्रीकांत झिपरे, अरविंद पाटील, शिवशरण अचलेर, अमर पाटील, राजू एकबोटे, रमेश शिंदे, काका सुतार, ओंकार उटगे, शैलेश राठौर, धनराज स्वामी, दर्शन घाटगे, महांतेश स्वामी, मल्लिनाथ माळी, ज्ञानेश्वर भोसले, स्वामीनाथ गवळी, आदीत्य गवंडी, श्रीशैल गवंडी, खाजप्पा झंपले, संतोष जमगे, गिरीश पवार, सागर गोंडाळ, उदय जमगे, श्रीकांत मलवे, तुषार मोरे, समर्थ स्वामी, आकाश चुंगीकर, लखन सुरवसे, साहील पवार, तन्मय इचगे, ओंकार महाडीक, नरसोबा पवार आदींसह शहरातील ज्ञात अज्ञात नागरिक व महीला मंडळींनी उत्स्फुर्तपणे सहभागी होवून या सेवापुर्ती सन्मान सोहळ्यास शोभा आणली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्वनाथ देवरमनी व मनोज जगताप, अशोक कलशेट्टी यांनी केले तर आभार श्रीकांत झिपरे यांनी मांडले. यावेळी महेश मालक इंगळे यांच्या वतीने उपस्थित सर्वांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता महेश मालक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व संतोष पराणे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब एकबोटे, श्रीकांत
झिपरे, अंकूश केत यांनी विशेष परिश्रम घेतले. या परिश्रम कार्यास सर्व स्विमींग ग्रुप सदस्यांचे सहकार्य लाभले.
(चौकट – मेजर अमोल माने यांच्या भारतीय सैन्यदलातील राष्ट्रसेवेने व सेवापुर्तीमुळे माझ्यासह येथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच मेजर अमोल माने यांच्या सेवेचा अभिमान आहे, कारण मेजर माने व त्यांच्या भारतीय सैन्यदलातील सहकाऱ्यांच्या सेवेमुळेच आज आपली भारत मातेची भुमी सुरक्षीत आहे. भारतीय सैन्यदलामुळेच आज आपण सारे आपले जीवन निर्वीघ्नपणे जगत आहोत. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला आपल्या सैन्यदलाचा अभिमान असला पाहीजे. प्रत्येकाने दररोज रात्री जेवण करताना आपल्या शेतकरी बांधवांचे, झोपताना भारतीय सैन्यदलाचे स्मरण करावे. दिवस उगवल्यावर आपल्या जीवनाला पुन्हा एक दिवस लाभला म्हणून सुर्यदेवास नमस्कार करावे. महेश मालक इंगळे यांच्या संकल्पनेतून मेजर अमोल माने यांच्या भारतीय सैन्यदलातील राष्ट्रसेवेने व सेवापुर्तीमुळे येथे झालेला मेजर माने यांचा सन्मान पाहून समाजातील विवीध स्तराने सैन्य सेवकांचे सन्मान करण्याचे उपक्रम वारंवार राबविण्यात यावे जेणेकरून अशा प्रकारच्या सन्मान सोहळयांनी सैन्यदलातील आपल्या जवान बांधवांना स्वकार्याचा नक्कीच अभिमान वाटेल व भविष्यात भारतीय सैन्यदलात सहभागी होणेकामी
महेश मालक इंगळे-प्रथमेश इंगळे व स्विमिंग ग्रुपचे हे उपक्रम नक्कीच प्रेरणादायी
ठरेल. – दिलीप भाऊ सिध्दे – तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट)
(चौकट – खरे सांगायचे तर भारतीय सैन्यदलाच्या माध्यमातून देशसेवा करण्याची संधी मिळणे माझे भाग्यच. आज या पुर्ण झालेल्या देशसेवेप्रित्यर्थ माझ्या आणि माझ्या कुटूंबाचे स्विमींग ग्रुप व महेश मालक इंगळे यांच्या कडून झालेल्या सन्मानामुळे
व त्यांच्याकडून लाभलेलं प्रेम, आदर पाहून
आम्ही सारे माने कुटूंबीय भारावून गेलो आहोत, आज खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचे सार्थक झाले आहे. – सेवानिवृत्त अमोल माने, मेजर – भारतीय सैन्यदल, प्रयागराज रेजिमेंट)
फोटो ओळ – मेजर अमोल माने व त्यांच्या सुविद्य पत्नी स्वाती माने यांचा सन्मान करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, मिलनदादा कल्याणशेट्टी व अन्य मान्यवर दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!