प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते वितरण…
प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते वितरण…

अक्कलकोट —केंद्रीय गृहमंत्री मा.श्री. अमितजी शहा यांच्या शुभहस्ते आणि मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा ०२ अंतर्गत २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे वितरण, तसेच १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.

याच अनुषंगाने अक्कलकोट पंचायत समिती येथून या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होत आपल्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांशी संवाद साधून घरकुल मंजुरी पत्रांचे वाटप केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. एम. के. शेगर, गटविकास अधिकारी श्री. शंकर कवितके, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. विभुते, श्री. खय्युम पिरजादे, श्री. परिचारक, श्री. पठाण, श्री. पाटील, श्री. दोडमनी, श्री. जमादार, श्रीमती कदम, घरकुल अभियंता श्री. पिंजारे यांच्यासह अनेक लाभार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.

