अनंत चैतन्य उच्च माध्यमिक प्रशालेचा निरोप समारंभ संपन्न —
अध्यक्ष मा.श्री.मल्लिनाथ कल्याणशेट्टी सर यांनी "बारावीनंतर पुढे काय? व विविध शैक्षणिक संधीचा कसा उपयोग करून घ्यावा " याविषयी सखोल मार्गदर्शन केले

अनंत चैतन्य उच्च माध्यमिक प्रशालेचा निरोप समारंभ संपन्न —- ————————————————


महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य उच्च माध्यमिक प्रशाला, हन्नूर येथे इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संस्थेचे जेष्ठ संचालक तथा मार्गदर्शक मा.श्री.मल्लिनाथ कल्याणशेट्टी सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी,संस्थेच्या शिक्षण विभागाच्या प्रमुख सौ. रुपाली शहा मॅडम, विज्ञान विभागाच्या प्रमुख सौ. पुनम कोकळगी मॅडम, प्रशालेचे प्राचार्य श्री. विलास बिराजदार, पर्यवेक्षक श्री. अशोक साखरे, प्रा. रवींद्र कालीबत्ते,प्रा.रमेश शिंदे, प्रा. काशीनाथ पाटील उपस्थित होते. प्रारंभी विद्या देवी सरस्वती व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी सरांच्या प्रतिमेचे पुजन करुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर इयत्ता बारावीच्या मुली कु. स्नेहा पटेल, कु. वर्षा गावडे, कु.कामरती सोनटक्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर संस्थेच्या संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.मल्लिनाथ कल्याणशेट्टी सर यांनी “बारावीनंतर पुढे काय? व विविध शैक्षणिक संधीचा कसा उपयोग करून घ्यावा ” याविषयी सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन कु. आरती धर्मसाले हिने केले तर आभार कु. ऐश्वर्या बिराजदार हिने मानले. यावेळी बारावीची मुले- मुली बहुसंख्येने उपस्थित होते.
