गावगाथा

Pune : पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याचा विटंबना करणाऱ्या तरुणाला अटक ; काँग्रेसकडून पुतळ्याला दुग्धाभिषेक

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे (प्रतिनिधी): पुणे रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर काल रात्रीच्या सुमारास सुरज शुक्ला या तरुणाने भगवे वस्त्र परिधान करून पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या विटंबनेच्या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून सुरज शुक्ला या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

तर या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी अरविंद शिंदे यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास दुग्धभिषेक घातला.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी अरविंद शिंदे म्हणाले, मागील १२ वर्षाच्या कालावधीत भाजप सरकारकडून समाजात तेढ निर्माण करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याबाबत सांगायचे झाल्यास काही दिवसापूर्वी भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनचे नामांतर करण्यात यावे, हे कशाचे उदाहरण आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

यातून समाजात केवळ तेढ निर्माण करणे हाच उद्देश आहे. पण हा उद्देश देशातील जनता कधीही पूर्ण होऊ देणार नाही. पुणे स्टेशन नामांतराची चर्चा थांबत नाही तोवर काल त्री भगवे वस्त्र परिधान करून सुरज शुक्ला या तरुणाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली.

या विटंबनेच्या घटनेमधून भाजप समजाला काय संदेश देऊ पाहते, यामुळे आम्ही आज निषेध नोंदवित असून पुतळ्याला दुग्धभिषेक घातला आहे. पण या प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून यापुढील काळात अशा प्रकारची आमची मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button