गावगाथा

भरत मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने गेल्या ४७ वर्षापासून महाशिवरात्र उत्सव विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन पुणेकरांसाठी एक पर्वणीच — श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले

महाशिवरात्री उत्सव विशेष

भरत मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने गेल्या ४७ वर्षापासून महाशिवरात्र उत्सव विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन पुणेकरांसाठी एक पर्वणीच — श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले

पुणे – (प्रतिनिधी)*

*भरत मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने गेल्या ४७ वर्षापासून महाशिवरात्र उत्सव समिती ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांच्या कडून उत्सवाच्या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन पुणेकरांसाठी एक पर्वणीच असल्याचे मनोगत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.*

पुणे येथील मोदी गणपती चौक नारायण पेठ येथे भरत मित्र मंडळ महाशिवरात्र उत्सव समिती ट्रस्ट सांस्कृतिक महोत्सव २०२५ चा उदघाटन सोहळा रविवारी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले हे बोलत होते.

या कार्यक्रमास पुण्याचे माजी महापौर अंकुशराव काकडे, विवेक खटावकर, पुणे म.न.पा. चे माजी नगरसेवक दत्ता सागरे, महेश खर्डीकर, निमंत्रक निरंजन दाभेकर यांच्या सह श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे लाला राठोड, संतोष भोसले, बाळासाहेब देसाई बबलादकर, रोहित खोबरे, मैनुद्दीन कोरबू, सरफराज शेख, गणेश भोसले, प्रशांत साठे, महांतेश स्वामी, संतोष माने आदिजन उपस्थित होते.

यावेळी डान्स पुणे डान्स-कलर्स ऑफ इंडियाचे स्वप्नील रास्ते, प्रसिद्ध नृत्यांगना- स्वामिनी वाडकर, कोरियोग्राफर कुणाल फडके, रत्नाकर शेळके, जतीन पांडे यांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.

सोमवारी लोकसंगीताच दान, माय मराठीच गुणगान… या कार्यक्रमाचे उदघाटन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी शिव-शक्ती पुरस्कार २०२५ चे देखील वितरण करण्यात आले. या शिव-शक्ती पुरस्कार मिळाल्या मध्ये खासदार अमोल कोल्हे, प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे, प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम, प्रसिद्ध चित्रकार रामचंद्र खरटमल यांना विविध मान्यवरांच्या उपस्थिती देण्यात आला.

मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी साय.६ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवपार्वती विवाह सोहळा यावर आधारित जिवंत देखावा, निर्माते सादरकर्ते- श्रीमंत शिवसाई प्रतिष्ठान ट्रस्ट पुणे गणेश लोणारे यांचा कार्यक्रम होणार आहे. या बरोबरच शिवगौरव पुरस्काराचे देखील आयोजन करण्यात आले आहे या पुरस्कारामध्ये प्रसिद्ध अभिनेते हार्दिक जोशी, जाधव नाट्य संसारचे विरेंद्र जाधव, कलाक्षेत्रम सारिज चे सागर पासकंटी, शिवमूर्ती शृंगार कलाकार विक्रम फाटक, प्रसिद्ध व्हायोलीन वादक आशिष बेहेरे, प्रसिद्ध मूर्तिकार इंद्रकुमार शिंदे यांना गौरविण्यात आले.

यासह बुधवार दि. २६ फेब्रुवारी साय.७ वा महाशिवरात्र, संदीप पाटील यांचा सौ-भाग्यवती फक्त महिलांकरिता द 5G गेम शो, गाणी गप्पा गोष्टी, गमत आणि गेम्स हे कार्यक्रम होणार आहेत. सहभागी महिलांना आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहेत. या करिता उध्योजक अंकित अगरवाल, ब्रेझन गोगरी, नेव्युल गोगरी तर मार्गदर्शक भोर वेल्हा मुळशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबा बोडके, प्रसिद्ध उद्योजक नितीन कोतवाल, रोहन शहा, करण गायकवाड, संस्कृती बालगुडे, विजय पाटकर, प्रवीण तरडे, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेशी, जगन्नाथ निवगुने, अथर्व सुदामे, डॅनी पंडित, गणेश लोणारे, अंजनेय साठे हे उपस्थित असणार आहेत. दरम्यान सकाळी १० वाजता भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार दि. २७ फेब्रुवारी रोजी साय. ७ वा निमंत्रक निरंजन बाळासाहेब दाभेकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या करिता प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्य मंत्री ना. माधुरी मिसाळ, युवा उद्योजक पुनित बालन, पीएनजी ज्वेलर्स चे सौरभ गाडगीळ हे असणार आहेत तर प्रमुख उपस्थिती श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या सह आदिजन असणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button