गावगाथा

*तुर्भे येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने वैद्यकीय शिबिराचे आयोजन*

उपक्रम

 

*तुर्भे येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने वैद्यकीय शिबिराचे आयोजन*

नवी मुंबई : (सुभाष हांडे देशमुख)

नवी मुंबई : तुर्भे स्टोअर येथील विठ्ठल -रुक्मिणी मंदिर ट्रस्ट तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली अखंड हरीनाम सप्ताह-२०२५ चे आयोजन विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते. या निमित्ताने २२ फेब्रुवारी रोजी डॉ. रवींद्र गोसावी, सिद्धिविनायक केअर सेंटर व साई दृष्टी सुपर स्पेशालिस्ट आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग चिकित्सा व चष्मा मुक्ती शिबीर घेण्यात आले. स्थानिक नागरिक, नवी मुंबई सफाई कामगार, महिला वर्ग, तसेच सप्ताह मध्ये आलेले शेकडो वारकरी यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिरात ईसीजी, रक्तातील साखर तपासणी, वजन आणि हायपर टेन्शन मॅनेजमेंट इत्यादी गोष्टींची शारीरिक तपासणी करून यावर नागरिकांना वैद्यकीय सल्ला, उपचार व मार्गदर्शन डॉ. रविंद्र गोसावी यांच्यातर्फे करण्यात आले. या शिबिरासाठी विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळ व स्थानिक नागरिकांचे बहुमोल असे उत्स्फूर्तपणे सहकार्य लाभले.

सलग चार दिवस चाललेल्या या अखंड हरीनाम सप्ताहाच्या चौथ्या दिवशी शिवसेना उपनेते
विजय चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, सुरेश कुलकर्णी, युवा बेलापूर विधानसभा प्रमुख महेश सुरेश कुलकर्णी तसेच ह.भ.प.संतदास रामदास मनसुख (ठाणे ) यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमधुर काल्याच्या कीर्तन सोहळ्याने या अंखंड हरीनाम सप्ताह -२०२५ ची सांगता करण्यात आला.

याप्रसंगी मा. नगरसेविका सौ. मुद्रीकाताई गवळी, उपशहर प्रमुख कचरू वाघमारे, तय्यब पटेल, दीपेश शिंदे, विनोद मुके, डॉ.रवींद्र गोसावी, डॉ. सांगळे, लक्ष्मण (मामा) मेदगे, आर पी आय चे शाखा अध्यक्ष अभिमान जगताप, भिकू पार्टे, चंद्रकांत भोसले, योगी कवडे आदी मान्यवर तसेच वारकरी संप्रदाय व विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे सहकारी, तुर्भे विभागातील नागरिक, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————+—–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button