गावगाथा

पुणे विभागस्तरीय युवा महोत्सवात कोन्हाळीच्या सचिन राम घंटे यांचे चित्रकलेत द्वितीय यश

यश

पुणे विभागस्तरीय युवा महोत्सवात कोन्हाळीच्या सचिन राम घंटे यांचे चित्रकलेत द्वितीय यश

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे तसेच आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज यांच्या सहकार्याने आयोजित पुणे विभागस्तरीय युवा महोत्सव २०२५-२६ दिनांक २१ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला.
या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी गावचे सचिन राम घंटे यांनी चित्रकला स्पर्धेत उत्कृष्ट कलागुणांचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकाविला. आपल्या नेतृत्वगुणांसह सर्जनशीलतेची छाप पाडत त्यांनी परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
या यशामुळे सचिन राम घंटे यांची येणाऱ्या राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी निवड झाली असून सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button